द न्यु मिलेनियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला अभुतपूर्व रिंगण सोहळा

मिलिंद संधान
शुक्रवार, 20 जुलै 2018

संपूर्ण शालेय परिसरात विठ्ठल नामाच्या जयघोषाने एक प्रकारे आंंनदीमय वातावरण होते. या वारीच्या निमित्ताने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी वारीत सहभाग घेवून वारीचा सुखद अनुभव घेतला.

नवी सांगवी (पुणे) - दापोडी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने आषाढी वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या विठठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत नामदेव यांच्या वेशभुषा सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. 

संपूर्ण शालेय परिसरात विठ्ठल नामाच्या जयघोषाने एक प्रकारे आंंनदीमय वातावरण होते. या वारीच्या निमित्ताने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी वारीत सहभाग घेवून वारीचा सुखद अनुभव घेतला.
    
यावेळी विद्यार्थ्यानी गाणे, नृत्य, पालखी सोहळा, रिंगण सोहळा, यांचा अनुभव घेतला. या पालखी सोहळ्यात ग्रंथ दिंडी व्दारे वाचनाची आवड निर्माण व्हावी हीच प्रेरणा विद्यार्थ्यानी सर्व परिसरात दिली. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यानी वारीत नृत्य, हरीनाम जप, टाळमुदूंग, भारुड, विठ्ठल नामघोष उत्कृष्टरित्या सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. 
 
यावेळी संस्थेचे उपाध्याक्ष विजय जगताप, सचिव शंकरशेठ जगताप, मुख्याध्यापिका जयश्री माळी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम नियोजन शिल्पा थिगळे यांनी केले. तर सुत्रसंचलन  एलिझाबेथ अॅथोनी व आभार सविता घराल यांनी केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The students of the new millennium school have experienced Ringan Sohla