पुणे : विद्यापीठातील खानावळी बाबत लावलेल्या नियमांना विद्यार्थ्य़ांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'रिफेक्‍टरी’ मध्ये (भोजनालय) सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा आजपासून बंद केली आहे. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्‍टरीसमोर आंदोलन करीत विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून रिफेटक्‍रीमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत होते. जेवणामध्ये आळ्या सापडल्या होत्या. त्यावरून संतप्त विद्यार्थ्यांनी अन्नाचा दर्जा सुधारण्याची मागणी लावून धरली होती. त्यावरुन विद्यापीठाने बैठक घेऊन नवीन नियमावली तयार केली आहे.

मात्र , नवीन नियम हे अन्यायकारक असल्यामुळे ते रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यासाठी सोमवारी दुपारी रिफेक्‍टरीच्या समोर शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Web Title: The students oppose the rules relating to the University's canteen