रोलर स्केटींगमध्ये पिंपळे सौदागर येथील खेळाडु चमकले

मिलिंद संधान
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : एशियन रोलर स्पोर्टस एक्स्पर्टन्स कौन्सिल कमिटी (एआरएसइसीसी ) द्वारा इंडियाज फास्टेस्ट स्केटर (आयएफएस) या स्पर्धा कासारसाई येथे नुकत्याच पार पडल्या. एकूण अठ्ठावीस लाख रोख रकमेच्या या स्पर्धेत त्यात पिंपळे सौदागर येथील ड्रीम झी स्केटिंग अँकेडमीचे विद्यार्थी तेजर रैना, हदान गावडे, धीर चौहान, ओवी पवार, सारथी सिनारे, आयुष चौहान, ईशान आतिश पवार या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली व त्यांनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे रोख बक्षिस पटकाविले.

अॅकेडमीचे प्रशिक्षक राहुल बिल्गी, अनुराधा बिल्गी, वैभव बिल्गी, वंदना बिल्गी हे चारही जनांनी भारताचे प्रतिनिधित्व केले असून या चौघांची इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनँशनल रोलर स्पीड स्केटिंग चँम्पियनशिप करीता निवड झाली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हे प्रशिक्षक आणि कासारसाई येथील बक्षिस पात्र खेळाडुंचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा याकरीता नगरसेवक काटे यांनी महापौर नितिन काळजे यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे.  

Web Title: students from pimpale saudagar goes to roller skating