विद्यार्थ्यांनी अवांतर पुस्तकेही वाचायला हवी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे : आजची पिढी वाचत नाही, ती पुस्तकांपासून दुरावली आहे, असा एक सार्वत्रिक आरोप आजच्या पिढीवर होत असतो. आजच्या पिढीने ‘श्‍यामची आई’पासून रिचर्ड बाख, कोएलो काफ्का अशा नामवंत लेखकांची पुस्तके वाचायला हवीत. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. शिवाय स्वतःची विचारप्रणाली विकसित होते. त्यामुळे विदयार्थ्यांनी शालेय पुस्तकांबरोबर अवांतर पुस्तके वाचायला हवीत. तसेच वाचनप्रेमींनी एकत्र यावे, निवांत बसून वाचन करावे, साहित्याची चर्चा करावी असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे हडपसर शाखेचे उपाध्यक्ष प्राचार्य के. डी. रत्नपारखी यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद हडपसर व चं. बा. तुपे साधना मुलींचे विद्यालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतीक पुस्तक दिन' साजरा करण्यात आला, याप्रसंगी रत्नपारखी बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या हडपसर शाखेच्या विश्वस्त भारती शेवाळे, प्राचार्य पुष्पाताई देशमुख, युवराज शेवाळे, उपप्राचार्य अदिनाथ पिसे, पर्यवेक्षक नवनाथ कुंभार, प्रतिभा कुंभार, मंदाकीनी कांबळे उपस्थित होते.

शेवाळे म्हणाल्या, पुस्तके म्हणजे आपले गुरू असून बदलत्या संगणक युगात देखील त्यांचे महत्व अबाधित आहे. पुराणकाळापासून संस्कृती, संस्कार व जीवनात यशस्वी होण्यासाठी धर्मग्रथापासून ते संगणकावर उपलब्ध असणाऱ्या ई बुक विदयार्थ्यांना वाचायला हवेत. ऐतिहासिक, पौराणिक,विनोदी, आत्मचरित्रे ही वाचूनच जीवनातील सुयोग्य रस्ता निवडणै सोपे होते. त्यामुळे पुस्तके हीच आपले खरे मित्र आहेत. 

Web Title: Students should read other books too