पुणे - मांजरीत वॉटर कपसाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 11 मे 2018

मांजरी (पुणे) : येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी पुरंदर तालुक्यातील शिवरी या गावात श्रमदान केले.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ यांनी श्रमदान केले. जलसंधारणासाठी सलग समपातळी चर खोदण्यात आले  तसेच बांध बंधिस्ती, ओढा खोलीकरण, पाणी व माती परीक्षण, वृक्ष संवर्धनासाठी  जाणीव जागृती आदी उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविले.

शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या डॉ. शर्मिला चौधरी यांच्या हस्ते झाले. शिवरी गावच्या सरपंच कोमल लिंभोरे, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब कामठे, बाळासाहेब लिंभोरे, प्रवीण कामठे, तानाजी कामठे, ज्ञानेश्वर कदम, राहुल कामथे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, प्रा. एस. एम. महाजन, डॉ. मेघना भोसले, प्रा. ज्ञानेश्वर अवसरे, डॉ. नेहा पाटील, प्रा. अनिल झोळ, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. नाना झगडे, प्रा. दत्तात्रय सांगळे, प्रा. नितीन लगड, प्रा. संजीव पवार आदी यावेळी उपस्थित होते.

शिवरी गावात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचे संकट उभे राहते. या श्रमदानातून सलग समपातळी चर निर्माण केल्याने पावसाचे पाणी साठून राहण्यास मदत होऊन पाणी टंचाईवर मात करता येईल असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला. श्रमदानात गावातील लहान मुलांपासून वयोवृद्धांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

Web Title: students shramdan for water cup