दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ‘स्वलेखना’तून प्रकाश

अक्षता पवार
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पुणे -  दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रश्‍नांची कागदावर लेखनाच्या स्वरूपात उत्तरे लिहिणे हे त्यांच्यासाठी दिव्यच असते. त्यासाठी परीक्षा विभागाने सहायक लेखनिक दिलेला असतो. परंतु, उत्तर लिहिताना लेखनिकाला विषय समजण्यापासून ते त्याने योग्य लिहिले आहे का नाही, याबद्दल विद्यार्थी अनभिज्ञच असतात. यावर निवांत अंधमुक्त विकासालयाने रामबाण उपाय शोधला असून, त्यासाठी ‘स्वलेखन’ ॲपची निर्मिती केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या ॲपच्या साह्याने दृष्टिहीन मुले स्वतः परीक्षा देण्यास समर्थ होतील व त्यांना लेखनिकांची गरज भासणार नाही. ॲपच्या माध्यमातून त्यांना मराठी टंकलेखनाचे प्रशिक्षण देणार आहे. हा ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, विद्यार्थी व शाळांना विनाशुल्क वापरता येईल, असे संस्थेच्या उमा बडवे यांनी सांगितले.

निवांत अंधमुक्त विकासालयाची सुरुवात १९९६ मध्ये झाली. या संस्थेला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. दहावीच्या पुढील तीन हजार विद्यार्थ्यांनी संस्थेद्वारे प्रशिक्षण घेऊन आयटी, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रांत उच्च पदाच्या नोकऱ्या मिळविल्या असल्याचे संस्थेच्या संचालक मीरा बडवे यांनी 
सांगितले.

असे होणार फायदे
 ४० शाळांमध्ये प्रशिक्षण सुरू
 तिसरीपासून पुढे सुविधा 
 औरंगाबाद, नांदेड, नाशिक, पुण्याचे ४५० विद्यार्थी प्रशिक्षित
 कोथरूड, कोरेगाव पार्क, भोसरीतील विद्यार्थी प्रशिक्षित
 ॲपमध्ये ७८ प्रकरणे

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी स्वलेखन ॲप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल. यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ देशातील प्रत्येक दृष्टिहीन विद्यार्थ्यापर्यंत पोचावा. तसेच, इतर राज्यांतील स्थानिक भाषांमध्येही याची सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- उमा बडवे, सदस्या, निवांत अंधमुक्त विकासालय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students training for writing the writing app

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: