#StudentIssue विद्यावेतनसाठी विद्यार्थी रस्त्यावर

बुधवार, 20 जून 2018

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच्. डी व एम.फिल् च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मार्च महिन्यापासून बंद केले असून या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एनएसयुआय, डापसा या विद्यार्थी संघटनांनी आज विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर भीक मांगो आंदोलन केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात होते. परंतु मार्च महिन्यापासून विद्यापीठाने हे विद्यावेतन बंद केले आहे. या विरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी निवेदने देवूनही विद्यापीठ प्रशासनाकडून निर्णय घेतलेला नाही.

विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणून आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एनएसयुआय, डापसा या विद्यार्थी संघटनांनी भीक मांगो आंदोलन केले. यातून मिळालेले पैसे विद्यापीठाला दिले. मात्र प्रकुलगुरू उमराणी यांनी ते घेण्यास नकार दिला. प्रकुलगुरू यांनी या प्रश्नावर येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या आंदोलनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट प्रतिनीधी अभिषेक बोके, संतोष ढोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठ अध्यक्ष नंदकुमार हांगे, एनएसयूआय विद्यापीठ अध्यक्ष सतिश गोरे, डापसा विद्यापीठ अध्यक्ष अमोल सरवदे, मराठवाडा विद्यार्थी समितीचे मारूती अवरगंड तसेच कुणाल सपकाळ, रूक्साना शेख, केशव माने, विजय भानवसे,अशोक पाटील, शिवराज कुंभार, सोमनाथ लोहार, सतिश पवार, देवा हांगे यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Students unions protest against SPPU administration