esakal | पुणे शहर सोडताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले...
sakal

बोलून बातमी शोधा

stu.jpg

कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी कायमचा गावाकडचा रस्ता धरला आहे. त्यामुळे त्यांचे डोळे शहर सोडताना पाणावले.

पुणे शहर सोडताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले...

sakal_logo
By
महेश जगताप

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात अनेक विद्यार्थी शिक्षणसाठी किंवा शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी येतात. ही संख्या लाखोंच्या घरात असते. कोणताही विद्यार्थी पुण्यात आला की तो पुण्याचाच होऊन जातो. कारण या शहरात असणाऱ्या पायाभूत सुविधा, रोजगार मिळण्याची संधी, किंवा काम करीत शिक्षण आपले पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी या शहरात घडले आहेत. पण कोरोना आला आणि सगळंच बिघडून गेलं. गेले चार महिने विस्कटलेली अर्थव्यवस्था, गेलेली रोजगार संधी आणि कोरोनाची धास्ती यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कायमचा गावाकडचा रस्ता धरला आहे. त्यामुळे त्यांचे डोळे शहर सोडताना पाणावले.

तारुण्याच वय म्हणजे कर्तृत्व गाजवण्याचं ,कष्ट करायचं ,शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात बदल घडवण्याचं, पण कोरोनाने यावर पूर्णपणे पाणी फिरवल आहे .सर्व शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांविना पुणे ओस पडल्याचे चित्र दिसत आहे .विशेषतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपले साहित्य घेऊन गावाकडे जात आहेत .

गावाकडे जात असताना त्यांना निश्चितच वाईट वाटणे स्वाभाविक आहे .या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने अभ्यास करण्यास सोपे जात होते .त्याचबरोबर आपल्याच क्षेत्रातील मित्रपरिवारही असल्याने एकमेकांना अभ्यासाला मदत होत होती . नैराश्याच्या काळात  मित्रपरिवार कामी येत होता .अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

नागेश मदनावे यांनी सकाळशी बोलताना आत्ता कस राहणार पुण्यात .राहिलो जरी सुरक्षित राहण्याची  धास्ती आहे .विशेषतः पालक आमच्या पेक्षा जास्त घाबरले आहेत .त्याचबरोबर आर्थिक भार ही मोठ्या प्रमाणात पडणार आहे .रूम भाडे , अभ्यासिका  शुल्क ,मेस यासाठी  कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येतो हे आणायचे कोठून अशा परिस्थितीमध्ये .त्यामुळे गावाकडे जाऊन आहे  त्या परिस्थितीमध्ये अभ्यास करणे ,घरच्यांना शेतीत मदत करणे ,आणि आणखी काही व्यवसाय करता येतो का हे पाहणार आहे .खचून चालणार नाही आत्ता सर्वांच्यापुढे हे संकट आहे .अश्या भावना नागेश यांनी  भावना व्यक्त केल्या  .

मी आत्ता पुणे शहरात न येता जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास करणार आहे .पालकांची बिलकुल तयारी नाही आम्ही पुण्यात जाण्यासाठी .वाईट तर नक्कीच वाटतंय अचानक कोरोना आला आणि सगळंच बदलल .गेली पाच ,सात वर्ष अभ्यास करतोय  .या वर्षी पास होईल अशी खात्री होती पण अजून परीक्षा पुढे ढकलल्या आहेत .त्या होतील की नाही यावर्षी अजूनही शंका आहे असे योगेश बाबर या विद्यार्थ्यांने  सांगितले.

loading image