विद्यार्थ्यांनो, पुण्यामध्ये तुम्ही परत येताय पण...

महेश जगताप 
शनिवार, 27 जून 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लाॅकडाउनमुळे पुण्यातून गावाकडे गेलेले विद्यार्थी पुन्हा पुण्याची वाट चालत आहेत. जरी विद्यार्थी पुण्यामध्ये येत असतील तरी येथे येऊन काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

स्वारगेट (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लाॅकडाउनमुळे पुण्यातून गावाकडे गेलेले विद्यार्थी पुन्हा पुण्याची वाट चालत आहेत. जरी विद्यार्थी पुण्यामध्ये येत असतील तरी येथे येऊन काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पुण्यामधील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अजूनही खानावळी, अभ्यासिका सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे येथे येऊनही हाल होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन, योग्य सामाजिक अंतर राखून, राहिले तर हितकारक ठरेल.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

तीन महिन्यापूर्वी अचानक कोरोना आला आणि सर्वांचीच पळापळ उडाली. अनेक विद्यार्थी फक्त एक दोन ड्रेस घेऊन गावाकडे मिळेल त्या वाहनाने गेले. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कोणालाही कल्पना नव्हती की अशीच परिस्थिती पुढचे तीन ते चार महिने राहील. त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये लोकसेवा आयोगाने परीक्षा ही पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला पण काही दिवसांपूर्वीच आयोगाने अनुक्रमे आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये राज्यसेवा व दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचे ठरविल्याने यामध्ये विद्यार्थ्यांची पुस्तकेही पुण्यामध्येच राहिल्याने अभ्यास कसा करायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे शहरात अभ्यासिका व सर्व पायाभूत सुविधा इतर शहराच्या तुलनेत अधिक असल्याने विद्यार्थी या शहराला प्राधान्य देतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जरी या गोष्टी असल्या तरी अजूनही शहरामध्ये मेस चालू झाल्या नाहीत. मग त्यामुळे जेवणाचा प्रश्न आहेच. त्याचबरोबर अभ्यासिकाही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे अभ्यास कुठे करणार ? एकाच रूममध्ये अनेक विद्यार्थी राहत असल्यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम पाळा जाणार की नाही हा प्रश्न उभा राहतो. त्याचबरोबर रूमच्या भाड्या बद्दलही मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे लगेच पुण्याची वाट न धरता आहे त्या साधनसामग्रीवर घरी अभ्यास करावा. योग्य नियमावलीनुसार अभ्यासिका आणि मेस सुरू होण्याचे आदेश महापालिकेकडून येताच पुण्यात यावे असे मत विद्यार्थी प्रतिनिधी सचिन ढवळे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students who have gone to the village are coming back to Pune