तानाजी चित्रपटासाठी विद्यार्थ्याने चक्क मुख्यध्यापकांना लिहिले....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पुणे : 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की, तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार. तानाजी चित्रपट प्रदर्शित होऊन आज 10 दिवस झाले असून अजुनही तानाजीची हवा कायम आहे. पण, तानाजी चित्रपटाबाबत मजेशीर घटना समोर आली आहे. तानाजी चित्रपट पाहण्यासाठी एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना चक्क रजेसाठी अर्ज केला आहे. विद्यार्थ्याचा हा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

'तानाजी'बाबत सैफ अली खाननेच घेतला आक्षेप, म्हणाला...

No photo description available.

मालेगाव तालुक्यातील कंरजगव्हाण येथील बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कुलचा हा विद्यार्थी. त्याचे नाव भाकेश राहाड. 14 जानेवारीला त्याने मुख्याध्यापकांना तानाजी चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी मिळण्याबाबत रजेचा अर्ज लिहिला आहे. या विद्यार्थ्याने अर्जात म्हटले आहे की, ''इतिहासातील शुरवीर ज्यांच्याबद्दल आम्हाला पुस्तकात खूप कमी प्रमाणात माहिती आहे. अशा महाराष्ट्राच्या मातीतील योध्दा नरवीर तानाजी मालुसरे यांची अधिक माहिती मिळण्यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी एक दिवसाची रजा मिळावी ही नम्र विनंती.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्याचा हा रजेचा अर्ज मुख्यध्यपकांनी  मंजुर देखील केला आहे. या अर्जावर परवानगी दिल्याचा स्टॅम्प आणि मुख्यध्यपकाची सही देखील दिसत आहे.
 
राज्य सरकारने महापालिका निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students written leave application for Taanaji movie to headmaster