
आशिया खंडातील दक्षिण पूर्व राष्ट्रांमधील बौद्ध संस्कृतीचा वारसा, वास्तुकला, स्थापत्यकला, चित्रकला यांचा अभ्यास करायचा आहे, त्याचे तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे आहे. त्यासोबत पर्यटन क्षेत्रात करिअरही करायचे असेल तर त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालयातर्फे (अभिमत विद्यापीठ) खास "बौद्ध वारसा आणि पर्यटन' (बुद्धिस्ट हेरिटेज अँड टुरिझम) हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे देशातील पहिलाच अभ्यासक्रम ठरणार आहे.
पुणे - आशिया खंडातील दक्षिण पूर्व राष्ट्रांमधील बौद्ध संस्कृतीचा वारसा, वास्तुकला, स्थापत्यकला, चित्रकला यांचा अभ्यास करायचा आहे, त्याचे तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे आहे. त्यासोबत पर्यटन क्षेत्रात करिअरही करायचे असेल तर त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालयातर्फे (अभिमत विद्यापीठ) खास "बौद्ध वारसा आणि पर्यटन' (बुद्धिस्ट हेरिटेज अँड टुरिझम) हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे देशातील पहिलाच अभ्यासक्रम ठरणार आहे.
पुणे विद्यापीठातील पाली विभाग आणि डेक्कन महाविद्यालयाने हा पदविका अभ्यासक्रम तयार केला आहे. याचा सामंजस्य करारावर नुकतीच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि डेक्कन महाविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुढील दशकात पर्यटन हा महत्वाचा उद्योग असेल. त्यामध्ये परकीय नागरिक भारतात येऊन येथील संस्कृती, इतिहास, ऐतिहासिक स्थळे, परंपरा याचा अभ्यास करण्याकडे कल वाढणार आहे. महाराष्ट्रातील अजंठा, वेरूळसह आंध्रप्रदेश, गुजरात, ओडीसी अशा अन्य राज्यांमध्ये प्राचीन बौद्ध वारसास्थळे आहेत. त्यामुळे चीन, जपान, थायलंड, मलेशिया, श्रीलंका, कंबोडिया, तिबेट यासह इतर आशियायी देशातील नागरिकांची संख्या लक्षणीय असणार आहे.
बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण
'बौद्ध साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास आणि आर्ट आक्टिटेक्चर यांचा एकत्र अभ्यास केला जात नाही. पण आता पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालयाच्या माध्यमातून हे सर्व विषय एकत्र शिकता येणार आहेत. या तीन सत्राच्या (40 क्रेडिट) पदविका अभ्यासक्रमात दोन सत्र वर्गात अभ्यासक्रम शिकवला जाईल. तर तिसरे सत्र हे प्रत्यक्ष काम आणि त्यातून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी चांगले प्रशिक्षण मिळेल यावर भर आहे.''
- डॉ. महेश देवकर, विभागप्रमुख, पाली, पुणे विद्यापीठ
किंमत एका मताची : नातवाला विजयी करून, आज्जीने घेतला जगाचा निरोप
"हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी पुरातत्त्व, पर्यटन या क्षेत्रात त्यांना नोकरी करू शकतील. येत्या एक दोन दशकात पर्यटन हा प्रमुख उद्योग असणार आहे. दक्षिण व पूर्व आशियातील अनेक पर्यटक भारतात येतात, पण त्यांना बौद्ध स्थळांची व्यवस्थित माहिती मिळत नाही. हे प्रशिक्षित विद्यार्थी त्यांना व्यवस्थित माहिती देऊ शकतील.''
- श्रीकांत गणवीर, सहाय्यक प्राध्यापक, डेक्कन महाविद्यालय
पार्टनरशिपचं आमिष दाखवलं अन् पुणेकराला दोन मुंबईकरांनी लुटलं!
दोन वर्षांपासून प्रयत्न
गेल्या दोन वर्षांपासून पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालय हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होतो, त्यातून त्याचा अभ्यासक्रम तयार केला आहे. हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असल्याने हा इंग्रजीतून शिकवला जाणार आहे. तसेच डेक्कन महाविद्यालयासोबत सामंजस्य करार झाल्याने तेथील पुरातत्त्व विभागाच्या कार्यशाळा, प्राचीन स्थळांना भेटी, अन्य पुरातत्त्व विषयक प्रशिक्षण यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी, असे गणवीर यांनी सांगितले.
वैशिष्ट्ये
- बौद्ध वारशाची तरुणांमध्ये जागरूकता वाढविणे
- बौद्ध वारशासह परकीय भाषांचा अभ्यासामुळे इतर देशांमध्ये कामाची संधी
- पर्यटन व वारसा क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार
Edited By - Prashant Patil