विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रमेश मोरे
सोमवार, 9 जुलै 2018

जुनी सांगवी : टाटा मोटर्स क्वालिटी ग्रुप तर्फ़े कै सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा सांगवी येथे ४१ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यात एक स्कूल बॅग, एक डझन वही, कंपास पेटी, पॅडचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी क्वालिटी हेड पॅसेंजर कारचे चेतन चावला म्हणाले, विद्यार्थ्यांनी  नेहमीच प्रयत्नशील राहून चांगले गुण मिळवावे व भविष्यात चांगले अधिकारी बनून अशीच मदत इतर मुलांना करावी व ही परंपरा अशीच पुढे सुरू रहावी.  

यावेळी  टाटा मोटर्स चे अधिकारी आशिष कदम, संजय विडेकर, धनराज जाधव, राजेंद्र महाळगी, दिपक जोशी, संतोष बल्लाळ, आशुतोष देशमुख, निलेश पिराजे, सोमनाथ कोरे, अजित निकम, गोपाळ बिरारी, परशुराम मालुसरे, संभाजी मोरे या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर आभार रामभाऊ खोडदे, दत्तात्रय जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सुनीता टेकवडे, भाऊसो दातीर, सीमा पाटील, हेमलता नवले, मनीषा लाड, कैलास म्हस्के, स्वप्नील कदम, शीतल शितोळे, दीपाली झणझणे, स्वाती दिघे, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, संगीता गायकवाड यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: study material distribute to students