दिव्यांग संगीत साधकांचे रस्त्यावरील लक्षवेधी सादरीकरण

पौड रस्त्यावरील चौकामध्ये एक टेम्पो थांबतो. त्यातून सात दिव्यांग उतरतात. पदपथावर पथारी लावतात. गाणे सुरु होते.
Divyang People
Divyang PeopleSakal
Summary

पौड रस्त्यावरील चौकामध्ये एक टेम्पो थांबतो. त्यातून सात दिव्यांग उतरतात. पदपथावर पथारी लावतात. गाणे सुरु होते.

कोथरुड - संध्याकाळी साडेसहाची वेळ. पौड रस्त्यावरील चौकामध्ये एक टेम्पो थांबतो. त्यातून सात दिव्यांग उतरतात. पदपथावर पथारी लावतात. गाणे सुरु होते. जाने वालो जरा मुडके देखो मुझे, दे दे प्यार दे अशी एकापेक्षा एक श्रवणीय गीते माईकवर ऐकवली जातात. त्यांची सुरेल गाणी ऐकून, कौतुक करत स्वेच्छेने त्यांना बिदागी देत लोक पुढे जातात.

माईकवर सुरु असलेली ही सुंदर गीते कोण गातोय हे लोक उत्सुकतेने पहात होते. दिव्यांगाचा गट आपली कला सादर करुन गर्दीचे लक्ष वेधून घेत होता. त्यांच्या कलेला सलाम करत बिदागी देवून लोक पुढे जात होते. दिव्यांगांनी सन्मानाने आपली उपजिविका भागविण्यासाठी पत्करलेला हा मार्ग अनेकांना आवडला व त्यांनी आपल्या ऐपतीनुसार बिदागी देवून या कलाकारांच्या कलेला दाद दिली.

दिव्यांग संगीत साधनाचे दत्ता भालेराव म्हणाले की, आमचा दहा जणांचा संच आहे. आम्ही आमची कला सादर करुन उपजिविका भागवत होतो. कोरोना मुळे आमच्या उपजिविकेचा जो प्रश्न निर्माण झाला होता त्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही असे जागोजागी जावून रस्त्यावर आमची कला सादर करतो. जत्रा, यात्रा, उत्सव,वारी मध्ये आम्ही आमची कला सादर करत असतो. बरेचदा काही लोक आम्हाला थोरांची जयंती, मयंती, वाढदिवस, सेलिब्रेशन आदी कार्यक्रमासाठी बोलावून आमच्या कलेचा सन्मान करतात.

संजय गांधी निराधार योजना मधून आम्हाला जी मदत मिळते त्यातून आमचा उदरनिर्वाह भागणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही कला सादर करुन उपजिविका भागवण्याचा प्रयत्न करतो.

बन्सी कांबळे, खंडू वाघमारे, बलभीम कांबळे, स्वप्नील पड्याळ, प्रकाश जाधव, पल्लवी भालेराव आदी कलाकार या संचात आहेत. ढोलकी, सिंथेसायझर, डफली, माईक, स्पिकर, बॅटरी आदी साहित्य या संचाकडे आहे. निंबराज उर्फ आबा सुर्यवंशी यांनी ही संगीत पार्टी सुरु केली. आपण उपलब्ध करुन दिलेल्या साहित्यातून दिव्यांगांची उपजिविका भागवावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या पश्चात ही जबाबदारी भालेराव यांच्याकडे आली आहे.

संगित साहित्य असल्यामुळे या दिव्यांग कलाकारांना आपला आवाज लोकांपर्यंत पोहचवता येतो. लोकांनी केलेल्या मदतीतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. रोज रोज कार्यक्रम मिळू शकत नाही. त्यामुळे रस्त्यावर कला सादर करण्याचा मार्ग या कलाकारांनी स्विकारला आहे. लोकांनी जर आम्हाला कला सादर करायची संधी दिली तर आम्हाला आधार होईल. असे या संचातील कलाकारांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com