हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तडकाफडकी हलवले

नांदेड, खडकवासला, पिरंगुट परिसरात नवीन जागेची चाचपणी; पोलीस अधीक्षकांनी घातले लक्ष
police
police sakal

किरकटवाडी: मागील अनेक वर्षांपासून लोणी काळभोर (Loni kalbhor) पोलीस ठाण्याच्या हद्दीत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत असलेले हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (Subdivisional Police Officer's Office) तडकाफडकी हलविण्यात आले असून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड, खडकवासला व पौड पोलीस ठाण्याच्या (police station) हद्दीतील पिरंगुट परिसरात सदर कार्यालयासाठी नवीन जागेचा शोध घेण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख स्वतः शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत या कार्यालयासाठी योग्य जागेची पाहणी करण्यासाठी फिरत होते. हवेली उपविभागात अगोदर लोणी काळभोर, लोणीकंद, पौड, हवेली आणि वेल्हे अशा पाच पोलीस ठाण्यांचा समावेश होता. त्यामुळे लोणी काळभोर येथील कार्यालयातून उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणे शक्य होत होते. मात्र दरम्यानच्या काळात लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलीस ठाण्यांचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात आल्याने हवेली उपविभागात पौड, हवेली व वेल्हे ही तीनच पोलीस ठाणे राहीली. तसेच ही पोलीस ठाणे पश्चिम भागात असल्याने उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांना लोणी काळभोर येथून कारभार पाहणे गैरसोयीचे झाले होते.

police
भाजीपाला कवडीमोल !

अचानक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला

किंवा एखादा मोठा गुन्हा घडल्यास हद्द लांब असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांना लोणी काळभोर येथून वेळेत घटनास्थळी पोचणे शक्य नव्हते. त्यामुळे कार्यालय तातडीने स्थलांतरित करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी घेतला. उपविभागीय कार्यालयाचे दप्तर सध्या पिरंगुट पोलीस चौकीत असलेल्या एका खोलीत ठेवण्यात आले असून नवीन जागेचा शोध घेण्यात येत आहे.

police
अवैध दारू धंद्यांवर यवतला कारवाई

" पौड, हवेली व वेल्हे अशा तिन्ही पोलीस ठाण्यांसाठी सोईस्कर अशा मध्यवर्ती ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी जागा शोधण्यात येत आहे. रेडीरेकनर दराप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासाठी रितसर भाडे दिले जाते. नांदेड, खडकवासला, पिरंगुट या ठिकाणी काही जागा पाहिल्या. अजूनही योग्य जागेचा शोध सुरू आहे. लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल." डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com