यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सु. ल. खुटवड  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - फलटण (जि. सातारा) येथे २६ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या सातव्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोदी लेखक, वक्ते व ‘सकाळ’चे उपसंपादक सु. ल. खुटवड यांची निवड झाली आहे.

पुणे - फलटण (जि. सातारा) येथे २६ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या सातव्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोदी लेखक, वक्ते व ‘सकाळ’चे उपसंपादक सु. ल. खुटवड यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेतर्फे दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रख्यात विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदा ‘विनोदी साहित्य’ या विषयावर हे संमेलन रंगणार आहे, अशी माहिती ‘मसाप’चे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ व फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र येवले यांनी दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले असतील. खुटवड यांची ‘फुकटचा ताप’, ‘फ..फ.. फजितीचा’, ‘नस्त्या उचापती’, ‘वरातीमागून घोडं,’ ‘हास्याचा मळा’ आदी बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राजगुरूनगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी भूषवले आहे.

Web Title: Subhash Khatwad was elected president of Yashwantrao Chavan Sahitya Sammelan