रसिकांनी अनुभवले कलावंतांचे "मैतर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मैत्री या नात्याला महत्त्वाचे स्थान आहे; पण जेव्हा कलाक्षेत्रात वावरणारी मित्रमंडळी एकत्र येतात तेव्हा वेगळाच कलाविष्कार जन्माला येतो. कोणाचा गायनात तर कोणाचा अभिनयात, कोणाचा दिग्दर्शनात तर कोणाचा लेखनात हातखंडा. त्यांच्यातील मैत्रीचे नाते रसिकांना अनुभवता आले. 

निमित्त होते अभिनेता सुबोध भावे लिखित "घेई छंद' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे ! रसिक आंतरभारती, ग्राफ्ट 5 पब्लिकेशन्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गायक शंकर महादेवन, बेला शेंडे, महेश काळे, कवी संदीप खरे, लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पडद्यामागील अनेक कलाकार एका मंचावर आले होते. त्यांच्यातील गप्पांमधून एकमेकांतील मैत्रीचे नाते उलगडत गेले. शिवाय, वेगवेगळ्या कला एकत्र गुंफल्याचाही अनुभव रसिकांना येत होता. 

"कट्यार' नाटकातील कविराजाच्या भूमिकेपासून, "बालगंधर्व', "लोकमान्य' या आव्हानात्मक भूमिका आणि "कट्यार' चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य हा प्रवास, त्या दरम्यान आलेले अनुभव, वेगवेगळी आव्हाने सुबोधने सांगितली. त्यामुळे कलाकाराचा पडद्यामागील प्रवास उजेडात आला. महेश काळे यांनी "घेई छंद मकरंद...', "दरस बीन...', शंकर महादेवन यांनी "सूर निरागस...', बेला शेंडे यांनी "आज म्हारे घर...' ही गाणी आपल्या सुरेल स्वरात सादर केली. त्यामुळे गप्पांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

Web Title: Subodh Bhave written book publishing