वर्गणीसाठी जमा केलेल पैसे वंचित मुलांसाठी, नवतेज प्रतिष्ठानचा आदर्श

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 25 मे 2018

मांजरी (पुणे) : विविध सण समारंभ, महापुराषांच्या जयंत्या, उत्सव यातील डामडौलाला फाटा देऊन सातववाडी येथील नवतेज प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करीत आहेत. या वर्षी कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून जमा झालेला सुमारे पन्नास हजार रूपयांचा निधी प्रतिष्ठानने वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देऊन इतर तरूणांसमोर आदर्श उभा केला आहे. 

यावर्षी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कात्रज येथील जिविका फौंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या माझी शाळा जगावेगळी या उपक्रमाला तसेच भोसरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक काम करणाऱ्या स्नेहवन या संस्थेला प्रत्येकी पंचवीस हजार रूपयांची मदत केली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अवधूत बरडे यांच्या हस्ते नुकताच हा निधी संबधीत संस्थांना देण्यात आला आहे.

गेली दहा वर्षापासून प्रतिष्ठान परिसरात सामाजिक काम करीत आहे. त्यातील कार्यकर्ते वेळोवेळी गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम, अपघातग्रस्तांना मदत, रक्तदान शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटप असे उपक्रम राबवीत आहे. याशिवाय परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. प्रतिष्ठानचे पदाधिकारी अस्लम मुजावर, अनिल कोळी, अनिल सुरवसे, संदीप काळभोर यांच्यासह कार्यकर्ते अशा उपक्रमांचे संयोजन करीत आहेत.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. बरडे म्हणाले,""एकीकडे विविध प्रकारचे उत्सव व त्याच्या मिरवणूकांसाठी हजारो रूपये अनावश्यक खर्च होताना दिसत असतात. त्याचवेळी अनेक वंचित घटकांना प्राथमिक गरजाही पूर्ण करताना कसरत करावी लागते. त्यामुळे प्रतिष्ठानने कार्यकर्त्यांच्या योगदानातून जमा होणारा निधी अशा वंचित घटकांसाठी उपयोगात आणण्याचे ठरवून त्यांना मदत केली जात आहे. सामाजिक जाणीवेचे अनेक तरूण यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत. ही चळवळ अधिकाधीक वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.''

Web Title: subscription money donates to poor children by navtej pratishthan