#mynewspapervendor वृत्तपत्रविक्रीतून मिळवले व्यावसायिक यश 

success in Business by selling newspaper
success in Business by selling newspaper

पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या चालवतात. 

भोसरी येथील योगेश बुक डेपोचे मालक आणि भोसरी वृत्तपत्र विक्रेता संघाचे विभाग प्रमुख प्रमुख योगेश बोटे हे मूळचे बार्शी तालुक्‍यातील देवळाली गावाचे. त्यांनी पीएमटी चौकात वयाच्या अठराव्या वर्षी वृत्तपत्र विक्रीला सुरवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या वृत्तपत्र विक्री व्यवसायाच्या वाटचालीत त्यांनी भरारी घेतली आहे.

आयटीआयमध्ये वेल्डिंग अभ्यासक्रम पूर्ण झालेला होता. त्यामुळे, वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करण्याचे त्यांचे निश्‍चित नव्हते. मात्र अपघाताने ते त्याकडे वळाले. सुमारे 20 वर्षांपूर्वी 1997-98 मध्ये 20 वृत्तपत्रांची विक्री व्यवसाय सुरू केला. अगोदर हातगाडी, टपरीमध्ये विक्री करत असे. भोसरीतील सर्वात जुने विक्रेते कृष्णा फुगे यांच्या मदतीने 2000मध्ये घरोघरी वृत्तपत्रे टाकण्यास सुरवात झाली. एकट्याने काम करताना योगेश यांनी स्टॉलवर सलग 14 तासही काम केले आहे. आता त्यांची किरकोळ आणि घाऊक विक्रीची दुकाने आहेत. 

विक्रेत्यासोबत सेल्फी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com