यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रम गरजेचे - प्रशांत रणवरे

राजकुमार थोरात
शनिवार, 30 जून 2018

वालचंदनगर (पुणे) : जीवनामध्ये यश प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी बरोबर कठोर परिश्रमाची गरज असल्याचे मत नव्याने नियुक्ती झालेले निमसाखरचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रणवरे यांनी व्यक्त केले.

प्रशांत रणवरे यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले असून त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी नुकतीच नियुक्ती झाली अाहे.त्याचा फडतरे उद्येाग समूहाच्या वतीने शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी फडतरे नाॅलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, व्यकंटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य संदीप पानसरे, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य के.बी.गवळी, ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख अतुल बाेंद्रे उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना रणवरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुले हुशार असतात.त्यांच्याकडे विविध कलागुण असतात.कलागुणांना प्रयत्नाची जोड दिल्यास यश मिळत असते. अधिकारी होण्यासाठी  शहरातील मोठ्या शाळेतून शिक्षण घेण्याची गरज नसते. माझे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण गावातील वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झाले आहे.माध्यमिक शिक्षण वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयामध्ये झाले.फडतरे नॉलेज सिटीमध्ये 2014 मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळाल्यामुळे यश मिळाल्याचे रणवरे यांनी सांगितले.

Web Title: for success give much efforts said prashant ranware