यशस्वी होण्यासाठी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घ्या - हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
सोमवार, 2 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी यश-अपयशाचा  विचार न करता  विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्याची गरज असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

वालचंदनगर (पुणे) : विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी यश-अपयशाचा  विचार न करता  विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्याची गरज असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे निंबध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत हाेते. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील,माजी संचालक ज्ञानदेव बोंद्रे, माजी सभापती प्रदीप पाटील, डॉ. नंदकुमार सोनवणे, वालचंदनगरच्या सरपंच छाया मोरे, राहुल रणमोडे, इंटक युनियटनचे वसंत जाधव, दयानंद झेंडे, विजय पाटील,घनशाम निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी सांगितले की, स्पर्धा म्हटले की,यश-अपयश असते स्पर्धेमध्ये एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराजय होत असतो. विद्यार्थ्यानी या गोष्टींचा विचार न करता विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षे संदर्भात  योग्य मार्गदर्शनासाठी विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यानी ही दहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षेच्या आभ्यासाची तयारी सुरु करण्याचे आवाहन केले.यावेळी पाटील यांच्या हस्ते निंबध स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी बक्षीसाचे वितरण केले.

Web Title: for success participate in competitions said harshawardhan patil