राजकारणातील यश हे अल्पजिवी, मर्यादित : महादेव जानकर

uruli
uruli

उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ राजकारणाकडे लक्ष न देता, जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस अधिकारी यासारख्या विविध प्रशासकीय पदासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत पशु, दुग्ध व मत्सविकासमंत्री महादेव जानकर यांनी सोरतापवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी व सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "सोरतापवाडी गणेश फेस्टीव्हल 2018' उद्घाटन पशु, दुग्ध व मत्सविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 14) झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना जानकर यांनी वरील मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबुराव पाचर्णे होते. 

यावेळी आमदार राहुल कुल, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परीषदेच्या बांधकाम व समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, भारतीय जनता पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष रोहिदास उंदरे, रामदास मेदनकर, दादासो सातव, गणेश कुटे, महेंद्र मेदनकर, उद्योगपती तानाजी चौधरी, दिपक गावडे, प्रविण काळभोर, प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप, सागर चौधरी यांच्यासह या फेस्टीव्हलचे संयोजक व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, सुदर्शन युमा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास चौधरी आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जानकर म्हणाले, मराठा व धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही. वरील दोन्ही समाजाला आरक्षम मिळाले पाहिजे व त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष प्रयत्नही करत आहे. मात्र मराठा, धनगर व माळी समाजातील बहुतांश युवक उच्च शिक्षण घेण्याऐवजी राजकारणाकडे जादा लक्ष देत आहेत. अल्पकाळात राजकारणात नाव होत असले तरी, काजकारणही अल्पकाळच टिकते हे वास्तव आहे. अपवाद वगळता बगुतांश युवकांना ग्रामपंचायत, जिल्हा परीषद व बाजार समिती याच्यापुढे यश मिळत नाही याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यामुळे युवकांचा फार मोठा तोटा होत आहे. यासाठी वरील तीनही समाजातील युवकांनी केवळ राजकारण हे क्षेत्र डोळ्यासमोर न ठेवता, प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वरील तीन समाजातील युवक मोठ्या प्रमानात उच्चपदस्थ झाले तरच समाजाचे भले होऊ शकते असेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

प्रदीप कंद व मंगलदास बांदल यांना उमेदवारीची ऑफर शिरुर लोकसभा मतदारसंघातुन जिल्हा परीषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी तर शिरुर विधानसभा मतदारसंघातुन जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. यापार्श्वभुमिवर बोलताना जानकर म्हणाले, प्रदीप कंद व मंगलदास बांदल यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेल्या असल्या तरी, त्यांचे पक्ष त्यांना उमेदवारी देतीलच याची खात्री देता येत नाही. मात्र वरील दोघांनीही राष्ट्रीय समाज पक्षात आल्यास, बांदल यांना लोकसभेसाठी तर कंद यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com