चौदा वर्षांनंतर सुप्रियाताईंमुळेच स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो : जगदाळे

अखेरीस ते चौदा वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहू शकले. त्यांचा तो आनंद गगणात मावेना. याचीच गोष्ट सुदर्शन जगदाळे यांनी आपल्या शब्दात सोशल मीडियाच्या माध्यमाव्दारे मांडली आहे.
चौदा वर्षांनंतर सुप्रियाताईंमुळेच स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो : जगदाळे

पुणे : बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार निधीतून केलेल्या 'अटोमॅटीक स्टँडींग व्हीलचेअर'च्या मदतीमुळे व मनातील जिद्दीमुळे ती पुढीलप्रमाणे.

''गोव्यातील तो चौदा वर्षांपुर्वीचा काळा दिवस मी कधीच विसरु शकत नाही. त्या भीषण अपघाताने माझं चालणं-फिरणं काळाने हिरावून घेतलं.पण तो माझी जिद्द हिरावून घेऊ शकला नाही.

त्या अपघातानंतर मला डॉक्टर म्हणाले होते की, 'सुदर्शन तु तुझ्या पायावर कधीच उभा राहू शकणार नाही.' डॉक्टरांचे हे शब्द बंदुकीतून निघणाऱ्या गोळीप्रमाणे माझ्या कानावर येऊन आदळले. पण मनातील जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. डॉक्टरांचे ते बोल चुकीचे ठरविण्याचा दृढनिश्चय मनाशी केला होता. या निश्चयाला संसदमहारत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आशीर्वादाची जोड मिळाली आणि आज मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो आहे.

मी चौदा वर्षांपुर्वी माझ्या नियतीशी जणू एक करार केला होता, तो केवळ सुप्रियाताईंनी केलेल्या मदतीमुळे पुर्ण होऊ शकला. 'अटोमॅटीक स्टँडींग व्हीलचेअर'चा शोध माझ्यासारख्या असंख्य गरजूंना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी क्रांतीकारक ठरतोय. ही माहिती मिळाल्यानंतर ही व्हिलचेअर घेण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु या व्हिलचेअरचा खर्च मला झेपणारा नव्हता. याबाबत मी सुप्रियाताईंकडे शब्द टाकला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या शब्दाला तातडीने प्रतिसाद देत ताई म्हणाल्या की, सुदर्शन माझ्यातर्फे तुम्हाला हवी असलेली व्हीलचेअर मी देते, फक्त एकदा सतिश पवार यांच्याशी व्हीलचेअरच्या फीचर्स बद्दल बोलून घ्या. ताईंच्या सुचनेनुसार मी सतिश पवार सर यांच्याशी संपर्क केला.त्यांना संबंधित व्हीलचेअरचे फीचर्स आणि इतर बाबतीत कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी सर्व तांत्रिक फिचर्स विस्ताराने समजून घेतले आणि विजय कान्हेकर सर यांच्याशी संपर्क करून दिला.

यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली व अवघ्या सात दिवसांतच मला अत्यंत आवश्यक असलेली आणि माझ्या हालचालीसाठी वरदान ठरणारी 'अटोमॅटीक स्टँडींग व्हिलचेअर' घरपोच मिळाली. या व्हीलचेअर मुळे मी तब्बल चौदा वर्षानंतर माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो.

माझ्यासारख्या साध्या व अतिशय सामान्य कार्यकर्त्याची देखील अडचण समजून घेऊन ताईंनी मला मदत केली.

त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे व माझ्या कुटुंबियांकडे शब्द नाहीत. ताई, नियतीशी केलेला करार आज केवळ तुमच्यामुळे पुर्ण झालाय याचा मला मनापासून आनंद आहे.

आपला नम्र-

सुदर्शन जगदाळे.

चौदा वर्षांनंतर सुप्रियाताईंमुळेच स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो : जगदाळे
पुण्यात 'ब्रेक द चेन'ला सुरुवात; अत्यावश्यक सेवांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश?

वर दिलेली फेसबुक पोस्ट करत सुदर्शन यांनी खासदार सुळे यांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात, जिद्द आणि सुप्रिया ताई यांच्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com