Video : पुण्यात येवलेवाडीतील गोडाऊनमध्ये आगीचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

- येवलेवाडीतील दांडेकर नगरमध्ये असलेल्या गोडाऊनला आग
- आगीचे कारण अस्पष्ट
- सध्या आठ अग्निशमन दलाच्या गाड्या, तीन पाण्याचे टॅंकर आणि दोन जेसीबी यांच्या मदतीने आग शमविण्याचे प्रयत्न सुरु

पुणे : येथील येवलेवाडी भागातील दांडेकर नगर येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

गोदामातील तेल आणि खाण्याच्या पदार्थांमुळे आगीने राक्षसीरुप धारण केले. या गोदामाच्या शेजारी असलेले ट्रक, टेम्पोही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाला याबाबत सकाळी सातच्या सुमारास माहिती कळताच सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

आगीचे प्रमाण जास्त असल्याने तासाभरानंतरही तिच्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या, तीन पाण्याचे टॅंकर आणि तीन जेसीबी दाखल झाले आहे. 

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला ट्रकने पेट घेतला आणि त्यानंतर गोडाऊनला आग लागली. या गोडाऊनमध्ये तेल आणि खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही. ही आग नेमकी का लागली ते कारण समजू शकलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudden Fire broke out in a godown at Yewalewadi dandekar nagar in Pune