कमला नेहरू रुग्णालयाला महापौरांची अचानक भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - महापौर मुक्ता टिळक यांनी कमला नेहरू रुग्णालयास बुधवारी अचानक भेट दिली. डॉक्‍टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, रुग्णालयातील अस्वच्छतेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात गुरुवारी तातडीची बैठकही त्यांनी बोलाविली. या वेळी एका गरोदर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठविले जात असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. 

रुग्णालयातील सेवा, सुविधांविषयी माहिती घेण्यासाठी महापौर टिळक यांनी ही भेट दिली होती. या भेटीत त्यांनी रुग्ण, त्यांचे नातेवाईक, उपस्थित कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करून व्यवस्थेविषयी माहिती घेतली. अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव, काही ठिकाणी बाकड्यांचा अभाव, विद्युत व्यवस्थेतील त्रुटी महापौरांना आढळल्या. 

रुग्णालयात केवळ शिकाऊ डॉक्‍टर उपस्थित होते. रात्रीच्या वेळी भूलतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्याने एका महिलेला दुसऱ्या रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठविण्यात येत असल्याचे महिलेच्या नातेवाइकांनी महापौरांना सांगितले. त्यावर महापौरांनी तत्काळ भूलतज्ज्ञ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. याच रुग्णालयात खासगी संस्थेमार्फत सुरू असलेल्या हृदयरोग उपचार आणि निदान विभागाचे काम व्यवस्थित सुरू असल्याचेही दिसले. कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही या रुग्णालयात सेवा व्यवस्थित मिळत नसल्याचा प्रकार अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: sudden visit of the mayor to the Kamala Nehru Hospital