आयातीमुळे साखर कारखाने अडचणीत - दिलीप वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पारगाव - ‘‘देशाच्या इतिहासात या वर्षी साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. त्यातच सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली. त्यामुळे साखर कारखान्यांच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबत लवकरच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

पारगाव - ‘‘देशाच्या इतिहासात या वर्षी साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. त्यातच सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली. त्यामुळे साखर कारखान्यांच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबत लवकरच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

दत्तात्रेयनगर- पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्यावर माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या २० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शेतकरी मेळावा व सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ या गीत संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी वळसे पाटील बोलत होते. 

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, राम कांडगे व सूर्यकांत पलांडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, संजय काळे, 

आत्माराम कलाटे, अतुल बेनके, मंगलदास बांदल, सुजाता पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे आदी उपस्थित होते. 
माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील यांनी शरद बॅंकेची स्थापना केली. भीमाशंकर कारखान्याची निर्मिती केली. बंधारे व डिंभे धरणांची सुरवात त्यांनी आमदारकीच्या काळात व आमदार नसतानाही शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीमागे लागून केली. माजी आमदार बी. डी. अण्णा काळे, अण्णासाहेब आवटे, किसनराव बाणखेले व सर्व सहकाऱ्यांच्या साह्याने तालुक्‍यात चांगले सामाजिक व राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा वारसा मला मिळाला. तुमच्या सर्वांची साथ मिळाली. ३० वर्ष तालुक्‍याचे प्रतिनिधित्व करत असताना परिसरातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक व भौतिक विकासकामांना प्राधान्य दिले, असे वळसे पाटील म्‍हणाले.

पांडुरंग महाराज येवले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुदाम खिलारी यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी आभार मानले.  

सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे साखर उद्योग अडचणीत आला आहे. कारखान्यांना प्रतिक्विंटलमागे एक हजार रुपये तोटा होत आहे. कारखाने बॅंकांचे कर्ज फेडू शकणार नाहीत. त्यामुळे बॅंका पुढील हंगामात कर्ज देणार नाहीत. पर्यायाने कारखाने अडचणीत येणार आहेत.
- दिलीप वळसे पाटील, संस्‍थापक, भीमाशंकर कारखाना

Web Title: sugar import sugar factory problem dilip walse patil