ऊस तोडायचाय? लावा फडाला काडी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई असल्याने पिके व नुकसान वाचविण्यासाठी असा निर्णय शेतकरी घेत आहेत.

त्यामुळे परिसरात पेटलेले फड, आभाळात धुरांचे लोट अन्‌ दारात पाचटाची काजळी पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नीरा नरसिंहपूर परिसरात नीरा नदी मागील सहा ते सात महिन्यांपासून आटली असून, भीमा नदी आटू लागली आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके संकटात सापडली आहेत.

सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. शेतात उभा असलेला ऊस कारखान्यास पाठवण्यास शेतकरी विविध हातखंडे अवलंबत असल्याचे दिसत आहे. सर्वच कारखान्यांना ऊस नेण्यास अडचण येताना दिसत आहेत.

पाण्याअभावी व हुमणीची लागण झाल्याने नुकसान होऊ नये, याची काळजीही शेतकरी करताना दिसत आहेत. मात्र, नद्यांतील पाणी आटल्याने आणि विंधन विहिरींचे पाण्याचे स्रोत कमी होऊ लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतात उभा असलेला ऊस काहीही करून तोडून कारखान्यास पाठवण्याची लगबग सुरू केली आहे. ऊस नियमाच्या अगोदर तोडून नेण्यासाठी फडाला तातडीने काडी लावून शेत रिकामे करण्यासाठी वेळप्रसंगी ऊसतोडीसाठी काही पैसे व पार्टी देण्यास सुरवात झाली आहे.

कारखान्यांपुढे प्रश्‍न 
नरसिंहपूर परिसरातील नीरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील गावात सर्रास शेतातील उभ्या असलेल्या उसाला काडी लावून पेटवण्याचे प्रकार वाढले आहेत. पेटलेल्या उसाच्या पाचटाची राख हवेत उडून गावोगावी घरादारात पडत आहे. नियमाअगोदर पेटवून तोडलेल्या उसाला साखर कारखाना प्रतिटन ५० ते ३०० रुपयांपर्यंत कपात करत आहेत. मात्र, ऊस पेटवून देण्याचा कल वाढत आहे. त्यातून कारखान्यांना हा प्रश्न मोठा अडचणींचा ठरू लागला आहे. तसेच पेटविलेल्या उसामुळे प्रदूषण वाढत आहे.

Web Title: Sugarcane Farmer Fire