पुढील वर्षी 14 लाख टन गाळप - हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

इंदापूर - कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने सन २०१८-१९ च्या हंगामात १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कामगारांनी यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

कर्मयोगी कारखान्यातील कामगारांना पंधरा टक्के वेतनवाढ दिल्याबद्दल कामगार युनियनचे अध्यक्ष मोहन काळे यांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्या हस्ते पद्मा भोसले, तसेच संचालक भरत शहा, रमेश जाधव, सुभाष भोसले, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, हनुमंत जाधव, भास्कर गुरगुडे, अंबादास वाघमोडे आदींचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, की मागील तीन वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेली. मात्र, सर्वांनी समन्वयाने काम केल्याने १० लाख १२ हजार टन उसाचे गाळप झाले, तर ४० ते ४५ कोटी रुपयांचे कर्ज फिटले. पुढील हंगामात कारखान्याचा १३ लाख, तर गेटकेनचा २ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे सरासरी ९ हजार टनांप्रमाणे प्रतिमहिना पावणेतीन लाख टन ऊस गाळपाचे नियोजन आहे. साखर उताऱ्यात वाढ, सहवीजनिर्मिती तसेच गाळपात अद्ययावत तंत्रप्रणालीचा अवलंब करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कारखाना पुढील हंगामात कर्जमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले. सूत्रसंचालन शरद काळे यांनी केले.

Web Title: sugarcane galap harshwardhan patil