भरधाव टेंम्पोच्या धडकेने बैलगाडीतील उस तोडणी मजूराचा मृत्यू

राजकुमार थोरात 
Monday, 30 November 2020

आज सोमवार (ता.३०) ला पहाटे पावणसहा वाजण्याच्या सुमारास भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उस तोडणी करण्यासाठी चार-पाच बैलगाड्या एकामागोमाग भवानीनगरहून बेलवाडी कडे निघाल्या होत्या.

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) जवळील खाऱ्या ओढ्यावरील पुलावर भरधाव वेगाने आलेल्या टेंम्पोने बैलगाड्यांना धडक दिल्याने एका उसतोडणी मजूराचा जागीच मृत्यू झाला.तर तिघे जण उस तोडणी कामगार  जखमी झाल्याची घटना घडली असून दोन बैल ही जखमी झाले.

आज सोमवार (ता.३०) ला पहाटे पावणसहा वाजण्याच्या सुमारास भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उस तोडणी करण्यासाठी चार-पाच बैलगाड्या एकामागोमाग भवानीनगरहून बेलवाडी कडे निघाल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेलवाडी व जाचकवस्तीच्या जवळ असलेल्या अरुंद पुलावरुन गाड्या पुढे जात असताना भवानीनगर बाजूकडून भरधाव वेगामध्ये आलेल्या टेंम्पोने धडक बैलगाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बैलगाडीमधील स्वप्निल उत्तम कांबळे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच संगिता सांगहे, अस्मिता जाधव, कोमल सांगळे हे जखमी झाले असून स्वप्निल कांबळेव नागनाथ सांगळे यांचे बैल जखमी झाले आहेत.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

याप्रकरणी टेंम्पोचा चालक नामदेव दशरथ कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आला असून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार तपास करीत आहेत.

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane worker dies after being hit by tempo to A bullock cart