पुण्यातील डोणजे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

निलेश बोरुडे
Thursday, 3 December 2020

डोणजे (ता.हवेली) येथील एका व्यक्तीने तब्बल 30 ते 40 फूट उंचीच्या झाडावर चढून पॅन्ट च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सिकंदर मन्ना शेख (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.

किरकटवाडी - डोणजे (ता.हवेली) येथील एका व्यक्तीने तब्बल 30 ते 40 फूट उंचीच्या झाडावर चढून पॅन्ट च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सिकंदर मन्ना शेख (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डोणजे येथील शेतातील एका उंच झाडावर चढून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती हवेली पोलिस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मुंडे , पोलीस नाईक विलास प्रधान व होमगार्ड चे जवान यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. सदर व्यक्तीने अत्यंत उंचावर जाऊन आत्महत्या केल्याने मृतदेह खाली घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्रप्रमुख सुजित पाटील व अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांती मृतदेह झाडावरून खाली घेतला.

पदवीधर निवडणुकीत महाविकासची 'आघाडी'; मतमोजणी अद्याप सुरुच

आत्महत्या केलेला सिकंदर शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. हवेली पोलीस ठाण्याकडून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

पंधरा दिवसापूर्वी सिकंदर शेख यांच्या मुलीने सातारा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून सिकंदर शेख हा मानसिक ताणतणावाखाली दिसत होता अशी माहिती शेख याच्या शेजार्‍यांनी दिली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide in Donaje pune