पिंपरी - नवविवाहित तरुणाची आत्महत्या

संदीप घिसे 
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन एका नवविवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 14) पहाटे चिंचवड येथे उघडकीस आली.

रमेश उत्तम करकरो (वय 24, रा. सायली कॉम्प्लेक्‍स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास रमेश याने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

रमेश हा पेंटिंगचे काम करीत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. तसेच त्यास दारूचेही व्यसन होते. शुक्रवारीही तो दारू पिऊन आला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

Web Title: suicide new married man