पुणे : वाकडमध्ये पोलिस हवालदाराची आत्महत्या 

संदीप घिसे 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास लावून पोलिस हवालदाराने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 17) दुपारी तीनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आली. 

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास लावून पोलिस हवालदाराने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 17) दुपारी तीनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आली. 

चंद्रकांत टिळेकर (वय 45, रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकर हे निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे रजेवर होते. नुकतीच त्यांनी नव्याने कार्यरत झालेल्या चिखली पोलिस ठाण्यात बदली झाली ी. मात्र ते ड्यूटीवर आलेच नव्हते. आजारपणाच्या त्रासातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. वाकड पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: suicide by police constable in wakad pune

टॅग्स