महिलेनं तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; पण चॅटिंगनंतर त्यानं उचललं मोठ पाऊल

महिलेनं तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; पण चॅटिंगनंतर त्यानं उचललं मोठ पाऊल

आळंदी : फेसबुकवरून विवाहित महिलेने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.संबंधित महिला तरुणाला शारीरिक संबंध ठेव असे म्हणत होती. दोघांमध्ये अश्लील चॅटिंग झाले. नंतर पैशांची मागणी महिला करु लागल्याने तणावात येऊन कोयाळीतील वीस वर्षीय युवकाने शेतातील विहिरीत आत्महत्या केली.

दरम्यान, संबधित महिलेवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. हा सर्व प्रकार १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत घडला. 

आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा कोयाळीतील हा तरुण एसवाय बीकॉम या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांच्यात फेसबुक मेसेंजरव्दारे अश्लील चॅटही झाले.

हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालल्यानंतर विवाहित महिलेने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून त्या तरुणाकडून पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकीही तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलाच जाच वाढला आणि या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळला होता. तो मानसिक तणावात गेला.

अखेर तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन लावून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचं देखील बहिणीला सांगितलं. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात विवाहित महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com