वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या

उरुळी कांचन - पुणे येथील भारती विध्यापिठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे उघडकीस आला आहे. 

अनिकेत संजय धुमाळ (वय-२२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे त्या विद्यार्थ्याचे नाव असून, वैधकिय अभ्यासक्रमाच्या अभ्यासाच्या तणावातून अनिकेतने आत्महत्या केल्याचा दावा अनिकेतच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी अनिकेतचे वडील संजय दत्तात्रय धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी अनिकेतच्या मृत्यूची नोंद आकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील महात्मा गांधी रस्त्यावर डॉ. अर्चना धुमाळ यांचे स्वत:च्या मालकीचे खासगी रुग्णालय आहे. त्यांना अनिकेत व सुयश अशी दोन मुले आहेत. थोरला अनिकेत हा पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अनिकेतसह घरातील सार्वजन आपआपल्या खोलीत झोपले होते. पाहटे तीन वाजण्याच्या सुमारास अनिकेतचे वडील संजय धुमाळ यांनी अभ्यासासाठी झोपेतून उठवले. यावर अनिकेतने वडिलांना सांगितले कि, तुम्ही झोपा मी माझा अभ्यास सुरु करतो. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अनिकेत अभ्यास करतो कि नाही, हे पाहण्यासाठी अनिकेतच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र खोलीतून कसलाही प्रतिसाद न आल्याने संजय व त्यांची पत्नी डॉ. अर्चना धुमाळ यांनी दरवाजाला जोराने धक्का देऊन दरवाजा उघडला असता, अनिकेतचा मृत्यूदेह खोलीतील पंख्याला लटकलेला आढळून आला. अनिकेतने शालच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे स्पष्ट झाले. यावर घडलेल्या घटनेची माहिती संजय धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली. 

अनिकेतच्या आई डॉ. अर्चना धुमाळ या उरुळी कांचन परिसरात नामांकित डॉक्टर आहेत. त्यांचा स्वत:चा सुयश नर्सिंग होम या नावाने महात्मा गांधी रस्त्यावर दवाखाना आहे.  त्यांना अनिकेत आणि सुयश अशी दोन मुले असून अनिकेत एक हुशार विद्यार्थी म्हणून उरुळी कांचन परिसरात ओळखला जात होता. सध्या तो भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. अनिकेतसारख्या हुशार विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तनावातुन आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह उरुळी कांचन परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com