वायसीएममध्ये रुग्णाची आत्महत्या

संदीप घिसे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) : वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत एका रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

पिंपरी (पुणे) : वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत एका रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

शंकर पात्रे (वय ४५) असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. पात्रे यांना दारूचे व्यसन होते. त्यावरील उपचारासाठी त्यांना ३ ऑगस्टला वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी सकाळी त्यांनी रुग्णालयातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना बाहेर जाता आले नाही. यामुळे ते इर्मजन्सी जिन्यातून दुसऱ्या मजल्यावर आले. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील डक्टमधून उडी मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे  कारण अद्याप समजले नसुन पोलिस तपास करत आहे.

Web Title: Suicides of a patient in YCM hospital