विद्यार्थ्यांनो, इंग्रजीविषयाला घाबरू नका, ही बातमी वाचा!

HSC-English
HSC-English

इंग्रजी विषय हा काही विद्यार्थ्यांसाठी सहजसोपा, तर काही जणांच्या पोटात भीतीचा गोळा आणणारा आहे. त्यात यंदा बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो गरजेचा आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर इंग्रजी शिकणे, हे मोठे आवाहन ठरू शकते. दुसऱ्या बाजूला नवीन पुस्तकाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी शिक्षकांना मुबलक वेळ मिळाला आहे. भाषा कुठलीही असो, ती शिकताना प्रकटवाचन, लेखनाचा सराव व त्याचबरोबर ती वरचेवर कानावर पडल्यास सोपी होते.

या विषयाचे विशलेषण करताना सर्वात प्रथम आपण बदललेल्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकू. यात जमेची बाजू अशी, की या पुस्तकात जुन्या पुस्तकाच्या तुलनेत धडे कमी आहेत. प्रत्येक धड्यानंतर दिलेल्या प्रश्नांमध्ये भरपूर विविधता आहे. या पुस्तकात सचित्रतेचा समावेश केलेला आहे. वाङ्मयातील विविध पैलूंचा अभ्यास करून विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयाची रुची निर्माण करण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. शब्दसंग्रह विकास आणि भाषा अभ्यासावर समर्पक भर देण्यात आलेला आहे.

धडे व कविता निवडताना देशी व विदेशी लेखकांच्या शैलींचे रसग्रहण करण्याची संधी या पाठ्यपुस्तकाने दिली आहे. लेखन कौशल्यात माईंड मॅपिंग व व्हर्च्युअल मेसेज रायटिंग व ड्राफ्टिंग स्टेटमेंट ऑफ पर्पज हे नवीन प्रकार मार्केट रेडिनेसच्या दृष्टीने अगदीच उपयुक्त आहेत. शेवटच्या चौथ्या खंडामध्ये विद्यार्थ्यांसाठी नॉव्हेल हा प्रकार नवीन आहे. कादंबरीचा इतिहास संक्षिप्त पद्धतीने दिल्सामुळे तो अत्यंत रोचक वाटतो.

कलाशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार उपयुक्त असला, तरी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना हे शिकणे आवश्यक वाटत नाही. त्यांच्यासाठी फंक्शनल किंवा व्यावहारिक इंग्रजी अधिक उपयुक्त ठरले असते. एकंदरीत नवीन पुस्तक हे योग्य तयारीनिशी शिकवणे आवश्यक आहे.

- सुमेधा फडके (शिक्षिका), सिटी प्राईड ज्युनियर काॅलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com