विद्यार्थ्यांसाठी 16 एप्रिलपासून समर कॅम्प 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे - मुले हेच देशाचे भविष्य असल्याने त्यांच्यावर योग्य वयात उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. म्हणूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वार्थाने बदल घडवून त्यांना नवीन मित्र जोडण्यासाठी पुढाकार घेता यावा, नेहमीच्या संरक्षित वातावरणापासून दूर जाऊन पालकांच्या मदतीशिवाय निर्णय घेता यावा, तसेच निसर्गाच्या सहवासात जाऊन मनमोकळे जगता यावे यासाठी सौ. संध्या नरेंद्र मुंदडा यांच्याद्वारा संस्थापित "संस्कार संस्कृती' गेली 17 वर्षे समर कॅम्पचे आयोजन करीत आहे. यंदा "सकाळ- मधुरांगण'च्या सहकार्याने सभासदांसाठी व "सकाळ'च्या वाचकांसाठी या कॅम्पचे आयोजन केले आहे.

पुणे - मुले हेच देशाचे भविष्य असल्याने त्यांच्यावर योग्य वयात उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. म्हणूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वार्थाने बदल घडवून त्यांना नवीन मित्र जोडण्यासाठी पुढाकार घेता यावा, नेहमीच्या संरक्षित वातावरणापासून दूर जाऊन पालकांच्या मदतीशिवाय निर्णय घेता यावा, तसेच निसर्गाच्या सहवासात जाऊन मनमोकळे जगता यावे यासाठी सौ. संध्या नरेंद्र मुंदडा यांच्याद्वारा संस्थापित "संस्कार संस्कृती' गेली 17 वर्षे समर कॅम्पचे आयोजन करीत आहे. यंदा "सकाळ- मधुरांगण'च्या सहकार्याने सभासदांसाठी व "सकाळ'च्या वाचकांसाठी या कॅम्पचे आयोजन केले आहे. डेक्कनपासून अवघ्या 45 मिनिटांच्या अंतरावर पिरंगुट येथे पर्वतरांगा आणि घनदाट झाडीने वेढलेल्या 17 एकर परिसरात "संस्कार संस्कृती समर कॅम्प'चे आयोजन केले जाते. अनुभवी व्यवस्थापनाद्वारे संचालित केल्या जाणाऱ्या या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या "ऍक्‍टिव्हिटीज'साठी अनुभवी शिक्षक येथे 24 तास उपस्थित असतात. 

ट्रेकिंग, टीम बिल्डिंग, आउटडोअर गेम्स, रॅपलिंग, कमांडो ब्रीज, नेट/रोप/रॉक/मंकी फ्लाईबिंग, लॅंडर पूल, टारझन स्विंग झोमॅरिंग, व्हॅली क्रॉसिंग, सेल्फ डिफेन्स, आर्चरी, रायफल शूटिंग, कॅम्प फायर, ट्रेझर हंट, योगासने, सूर्यनमस्कार, आर्ट अँड क्राफ्ट, डान्स, थिएटर ऍक्‍टिंग, जंगलट्रीप, रेन डान्स, ऍग्रो शेतीविषयक मार्गदर्शन अशा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणाऱ्या विविध गोष्टींचा समावेश कॅम्पमध्ये असतो. 

2 दिवस/1 रात्र, 3 दिवस/2 रात्री, 7 दिवस/6 रात्री - असे 3 पर्याय या समर कॅम्पमध्ये उपलब्ध आहेत. नरेंद्र व सौमित्र मुंदडा हे या कॅम्पसचे नियोजन करतात. 

या कॅम्पचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे 5 दिवस/4 रात्रींच्या खास म्युझिकल/ सिंगिंग कॅम्पचे स्वतंत्ररीत्या आयोजन केले जाते. शास्त्रीय गायिका- संगीतकार, सारेगमप लिट्‌ल चॅम्पच्या गुरू व समुपदेशक वर्षाताई भावे या आगळ्यावेगळ्या कॅम्पमध्ये मार्गदर्शन करतील. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे मूलभूत धडे या कॅम्पमध्ये गिरविले जातात. 

कॅम्पमध्ये मुला-मुलींकरिता स्वतंत्र निवास व्यवस्था, नाष्टा-माध्यान्ह भोजनात संपूर्णत- शाकाहारी पदार्थांचा समावेश तर रात्रीच्या जेवणात मुलांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी चविष्ट पदार्थांचा समावेश केला जातो. तसेच येथे मिनरल वॉटरचीच व्यवस्था केली जाते. येथून परतणारा प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्‍वासाने समृद्ध अनुभव गाठीशी घेऊन बाहेर पडतो, असे संस्कार संस्कृतीचे संचालक सौमित्र मुंदडा यांनी सांगितले. 

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क - 
9075011142 किंवा 8378994076 

संस्कार संस्कृती निवासी शिबिराच्या तारखा 
1) 2 दिवसांचे ऍडव्हेंचर शिबिर - 16-17 एप्रिल, 19-20 एप्रिल, 27-28 एप्रिल, 30 एप्रिल-1 मे, 7-8 मे, 10-11 मे, 14-15 मे, 21-22 मे 
2) 3 दिवसांचे ऍडव्हेंचर शिबिर - 16-18 एप्रिल, 19-21 एप्रिल, 30 एप्रिल-2 मे, 7-9 मे, 10-12 मे, 14-16 मे, 21-23 मे 
3) 7 दिवसांचे कल्चरल शिबिर - 29 एप्रिल-5 मे, 13-19 मे 
4) 5 दिवसांचे म्युझिकल शिबिर - 22-26 एप्रिल 

येथे करा नोंदणी 
- "सकाळ' मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, "सकाळ' मधुरांगण विभाग, दुसरा मजला (वेळ - सकाळी 11 ते सायं. 6) 
- श्री पार्वती निवास, 118/बी, दुसरा मजला, मुख्य प्रभात रोड (वेळ - सायं. 6 ते रात्री 8) 
- प्रवेशमूल्य रोख, धनादेश, ऑनलाइन ट्रान्स्फर, कार्डद्वारे भरून पूर्वनोंदणी करणे आवश्‍यक.

Web Title: Summer camp for students from 16th April