शहर आणि परिसरात उन्हाचा चटका कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारवा असे वातावरण सध्या राज्यात असून, पुढील चोवीस तास शहर आणि परिसरात उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. राज्यात रत्नागिरी येथे सर्वाधिक म्हणजे 39.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरात कमाल तापमानाचा पारा 36.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. कमाल तापमानाच्या सरासरीपेक्षा 4.2 अंश सेल्सिअसने ही वाढ झाली. मात्र त्याच वेळी किमान तापमानाचा पारा 1.4 अंश सेल्सिअसने वाढून 14 अंश सेल्सिअस झाले. विदर्भात किमान तापमानाच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून, मध्य महाराष्ट्रात मात्र यात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

Web Title: summer heat start