उन्हाळ्याच्या सुटीत उद्याने हाऊसफुल ; चिमुकली खेळात दंग

रमेश मोरे 
सोमवार, 21 मे 2018

जुनी सांगवी : एरव्ही शाळा, अभ्यासात गुंतलेली चिमुकली मंडळी सध्या उन्हाळ्याच्या सुटीचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे चित्र परिसरातील उद्यानांमधुन पहावयास मिळत आहे. शाळा काही दिवसांवर येवुन ठेपल्याने आजोळी मामाच्या गावी, बाबांच्या गावी गेलेली मंडळीही परतली असल्याने सध्या सांगवी परिसरातील उद्याने बाळगोपाळांच्या कलकलाटाने हाऊसफुल झालेली दिसत आहेत.

टि.व्ही. मोबाईलमुळे पारंपारिक खेळ विसरत चाललेल्या चिमुकल्यांना उद्यानांमधुन मैदानी खेळ खेळतानाचे चित्र सध्या सांगवीतील सर्वच उद्यानांमध्ये दिसत आहे. येथील शिवसृष्टी उद्यान, संत गोरोबा कुंभार उद्यान, वेताळ महाराज उद्यांनात नव्याने समुद्री रेती टाकल्याने बाळ गोपाळांचे हरवलेले खेळ आट्या पाट्या, खो-खो, कबड्डी, रूमालपाणी, आंधळी कोशींबीर, लगोर, पायावर माती घेवुन बनवलेलं घर, खोपा, तर समुद्री रेतीवर झोपुन स्वत:ची आकृती रेतीवर उमटवण्याचा खेळ खेळण्यात दंग झालेली चिमुकली सध्या उद्यानांमध्ये पाहावयास मिळत आहेत. 

Web Title: Summer Holiday Gardans housefull; Stung at the Chimukkali game

टॅग्स