सुपरहिट गाण्यांची तरुणांसाठी मेजवानी

Milka-Sinh
Milka-Sinh

पुणे - तरुणांचे आवडते गायक आणि संगीतकार यांचा धमाल कार्यक्रम ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा  कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग आहेत, तर सहप्रायोजक सुझुकी इन्ट्य्रुडर व फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे आहेत. 

पुण्यात सादर होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग, बादशाह हे त्यांची गाजलेली गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे.

‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ 
    शनिवार - २८ एप्रिल 
    सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
    रविवार - २९ एप्रिल 
    सहभाग - मिका सिंग, बादशाह 
    कुठे - शिवछत्रपती क्रीडासंकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
    केव्हा-: संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
    ऑनलाइन बुकिंगसाठी - BOOK MY SHOW 
    अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५ 

ऑफलाइन बुकिंग काउंटर 
    कधी - सकाळी ९ ते ११.३०, दुपारी ५ ते ८
    कोठे - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), 
बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) 
    ‘सकाळ’ कार्यालय, बुधवार पेठ. 
    ( सकाळी ११ ते संध्याकाळी ६.०० पर्यंत)

लकी ड्रॉद्वारे कपल पासेस 
मिका सिंग हा तरुणांच्या आवडीचा गायक, संगीतकार. मिकासिंगची गाणी आणि त्याचे सादरीकरण तुफान लोकप्रिय आहे. ‘बस एक किंग’, ‘मौजा ही मौजा’, ‘धन्नो’ ही त्याची काही लोकप्रिय गाणी. मिका सिंगबद्दल खाली काही प्रश्‍न विचारले आहेत. त्या प्रश्‍नांची योग्य उत्तरे आम्हाला summersault@esakal.com वर कळवा रात्री १२ वाजेपर्यंत आणि भाग्यवान विजेता बना. अचूक उत्तरे देणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉद्वारे मिळतील कपल पासेस. विजेत्यांची नावे ई-मेलद्वारे कळविण्यात येतील.

    १) मिका सिंगच्या पहिल्या अल्बमचे नाव काय?
    २) मिका सिंगच्या भावाचे नाव काय? 
    ३) मिका सिंगचा जन्म कोठे झाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com