‘यिन’तर्फे पुण्यात १७, १८ जूनला समर यूथ समिट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल.

पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल.

शिक्षणव्यवस्था नैतिक अधिष्ठान असणारी, सुसंस्कृत युवापिढी तयार करणारी आणि सामाजिक जाणिवा निर्माण करणारी आहे. या उद्दिष्टांची पूर्तता ‘यिन’च्या विविध उपक्रमांतून होत आहे. 
- आमदार तानाजी सावंत,  संस्थापक सचिव ‘जेएसपीएम’,  अध्यक्ष ‘टीएसएसएम’ 

‘यिन’चे युवक-युवती संघटनशक्तीच्या जोरावर विकासात योगदान देत 
आहेत. यामुळे ‘सकाळ परिवारा’कडून देशाला खूप अपेक्षा राहतील. 
- डॉ. गिरीश देसाई,  कार्यकारी संचालक,  पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट 

यूथ समिटमध्ये तरुणांना दिशा देण्यासाठी आयोजित मार्गदर्शन सत्रे मी स्वत: गेल्या वर्षी अनुभवली आहेत. अशा उपक्रमाची फार मोठी गरज आजच्या पिढीला आहे.  
-संतोष रासकर,   संचालक,  सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, पुणे  

नवा भारत घडविण्याची क्षमता तरुणाईत आहे. बुद्धीच्या बळावर स्वतःचा विकास घडविताना देशासाठी आणि समाजासाठी तरुणांनी पुढे यावे यासाठीच ‘यिन’चे हे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.  
- वास्तुपाल रांका,   संचालक, रांका ज्वेलर्स, 

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा, तसेच त्यांच्या भविष्याची दिशा ठरवणार स्तुत्य उपक्रम म्हणजेच ‘यिन’चा समर यूथ समिट कॅम्प. 
- संजय चोरडिया,  चेअरमन, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

कोठे, कधी होणार  यिन समर यूथ समिट
नाशिक  - ८ व ९ जून 
नागपूर - १२ व १३ जून 
नगर  - १५ व १६ जून
पुणे - १७ व १८ जून  
औरंगाबाद - १९ व २० जून

बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सलग दोन दिवसांचे हे शिबिर असेल. तरुणाईच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासात हे ‘समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने याचे आयोजन केले आहे. या वर्षीचे पहिले समिट कोल्हापूरला नुकतेच झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील अग्रगण्य स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी (नाशिक) प्रस्तुत ही समिट असून, बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्या सहयोगाने ती होईल. ‘जेएसपीएम’ पॉवर्डबाय असणाऱ्या या समिटमध्ये सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रेटींशी संवाद, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद अशी सत्रे होतील. या समिटचे असोसिएटस्‌ स्पॉन्सर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पुणे), नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ (पुणे), सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌ (पुणे), सृजन कॉलेज ऑफ डिझाइन (पुणे) आणि रांका ज्वेलर्स (पुणे) आहेत. 

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा
पुणे शहर - ८९५६५५५७७७
पुणे ग्रामीण - ९६३७५१८०२०
पिंपरी-चिंचवड - ९०७५००७९५८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Youth Summit on June 17 and 18 in Pune