‘बॉलिवूड हॉटेस्ट लाइव्ह शो’ची उत्कंठा शिगेला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग आणि बादशाह यांच्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या लाइव्ह कॉन्सर्टची उत्कंठा शिगेस पोचली आहे. 

तरुणांच्या आवडीचे गायक, त्यांची गाणी आणि तरुण फॅन्सना एकत्र आणणारी ही कॉन्सर्ट शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होत आहे.

पुणे - बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग आणि बादशाह यांच्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या लाइव्ह कॉन्सर्टची उत्कंठा शिगेस पोचली आहे. 

तरुणांच्या आवडीचे गायक, त्यांची गाणी आणि तरुण फॅन्सना एकत्र आणणारी ही कॉन्सर्ट शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होत आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सह प्रायोजक सुझुकी इन्ट्य्रूडर, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद ट्रॅव्हल हे आहेत. 

शोच्या निमित्ताने प्रायोजकांनी ‘सकाळ’शी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

गेली बारा वर्षे आम्ही ‘सकाळ’सोबत असोसिएट आहोत. ‘सकाळ’ पुणेकरांचा विश्‍वास आहे. ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने विविध उपक्रम होत असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही सहभागी असतो. पुणे आता कॉस्मोपॉलिटन शहर झाले आहे. ‘सकाळ समरसॉल्ट’ हा तरुणाईचा कार्यक्रम आहे. अनेक बहुभाषिक आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्यांशी आम्ही नक्कीच जोडले जाऊ. 
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, 
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

‘सकाळ’ हा कार्यक्रम इनिशिएट करीत आहे. ‘लिनन किंग ब्रँड’च्या उद्‌घाटनापासून ‘सकाळ माध्यम समूह’ आमच्या सोबत आहे. हा कार्यक्रम मुख्यतः तरुणांना आवडणारा आहे. त्यात हा कार्यक्रम उन्हाळ्यात आहे. आणि उन्हाळ्यात असणारी ‘लिनन’ची गरज आणि तरुणाई या दोन्ही गोष्टी ‘लिनन किंग ब्रॅंड’साठी पोषक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आम्हीही उत्सुक आहोत. 
- कौशिक मराठे, डायरेक्‍टर, लिनन किंग

‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा ‘सकाळ’चा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. पुणेकरांसाठी ‘सकाळ’ कायम नवनवीन कार्यक्रम करीत असते. त्यामुळे या कार्यक्रमाचा भाग व्हायला आम्हाला आवडते. हा कार्यक्रम तरुणांचा आवडता असा आहे. तरुणांना आवडणारे बॉलिवूड गायक, संगीतकार असणार आहेत. त्यामुळे एक वेगळा अनुभव पुणेकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे आम्ही हजारो पुणेकरांशी जोडले जाणार आहोत. 
- अखिलेश जोशी, कार्यकारी संचालक, गिरिकंद ट्रॅव्हल्स

‘समरसॉल्ट २०१८’ या संगीत मैफलीसाठी ‘सकाळ’सोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सुझुकी या ब्रँडचे ‘वे ऑफ लाइफ’ हे आमच्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्येच नाही, तर तरुणांशी असलेल्या आमच्या नात्यातून प्रतिबिंबित होते. हा कार्यक्रम तरुणांना आमच्याशी जोडणारे एक व्यासपीठ ठरेल, कारण  या  कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या हजारो तरुणांशी आम्ही जोडले जाणार आहोत. 
- संजीव राजशेखरन, एक्‍झिक्‍युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट, सुझुकी मोटारसायकल, इंडिया

सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018 
 शनिवार - २८ एप्रिल 
 सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
 रविवार - २९ एप्रिल 
 सहभाग - मिका सिंग, बादशाह 
 कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
 केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
 ऑनलाइन बुकिंगसाठी - bookmyshow.com 
 अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५ 

प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध 
 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (स. ९ ते ११.३०, सायं. ५ ते रात्री ८) 
 ‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ (स. ११ ते सायं. ६) 
 गिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना (स. १० ते सायं. ६) 
 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (स. ११ ते सायं. ५). 

Web Title: summersault event song bollywood