
- विविध धर्मगुरू, मौलानांसह नागरिक रॅलीत होणार सहभागी.
पुणे : नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी 'कुल जमाते तंजीम' या संघटनेच्या वतीने रविवारी (ता. 29) सकाळी साडेदहा वाजता गोळीबार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध धर्मगुरू, मौलानांसह नागरिक रॅलीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती या संघटनेच्या वतीने देण्यात आली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
"कुल जमाते तंजीम'मध्ये विविध संघटनांचा सहभाग आहे. शुक्रवारी (ता. 20) आयोजित या पत्रकार परिषदेस इंडियन मुस्लिम फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुन्नवर कुरेशी, ओबीसी मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष इकबाल अन्सारी, वहेदत-ए-इस्लामी हिंदचे इलियास मोमीन, महाराष्ट्र ऍक्शन कमिटीचे अध्यक्ष जाहीद शेख, उपाध्यक्ष मोहियुद्दीन सय्यद, एमआयएमचे शहराध्यक्ष लियाकत खान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे महासचिव रझी अहमद खान यावेळी उपस्थित होते.
Video : अन् पोलिसांनी चक्क आंदोलकांसह गायले राष्ट्रगीत!
या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रहेमान हे उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.