संडे सायन्स स्कूल उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा, यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीत येत्या रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांनी हा उपक्रम आयोजिला आहे.

दर रविवारी दोन तास विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित प्रयोग किंवा सायन्स मॉडेल प्रत्येक विद्यार्थी स्वतः हाताने बनवतात. तयार केलेले मॉडेल विद्यार्थ्यांना घरी नेता येते, ज्यातून त्यांची घरातली प्रयोगशाळा तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यानच्या २३ रविवारी एकत्र जमून स्वहस्ते प्रयोग करीत विज्ञान शिकणार आहेत.

इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गातील मुले या कालावधीत सुमारे ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाकघरातील विज्ञान आदी संकल्पनांवरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरिस्कोप, सूर्यमाला यांसारखे प्रकल्प तयार करतील. पाचवी आणि सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल. 

सातवी ते नववीमधील विद्यार्थी या उपक्रमात सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मॉडेल, हायड्रॉलिक आर्म, मायक्रोस्कोप, आर्किमिडीजचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा तयार करणे असे प्रयोग करतील. नुसते प्रयोगच नाही तर विविध गोष्टींचे निरीक्षण करणे, त्यांच्या नोंदी घेणे अशा सवयीही मुलांना लागतात. यासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना शेवटी प्रमाणपत्र वितरित केले जाते. आतापर्यंत २० हजारांहून अधिक मुलांनी घरीच त्यांची प्रयोगशाळा बनविली आहे.

सर्व साहित्यासह शुल्क
३ री व ४ थी साठी - ४८०० रुपये
५ वी व ६ वी साठी - ५६०० रुपये
७ वी ते ९ वी साठी - ६८०० रुपये
शुल्क दोन धनादेशांद्वारे किंवा रोखीने भरता येईल
अधिक माहितीसाठी संपर्क - ९८५००४७९३३ किंवा ९३७३०३५३६९
 
Web Title: sunday science school