संडे सायन्स स्कूलला उत्साहात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

स्वत:च्या हातांनी प्रयोग करायला मिळण्यातला आनंद काही औरच असतो. शाळा-घरांमध्ये अनेकदा मुलांना ‘हे करू नका-ते करू नका’ असेच सांगितले जाते. त्यामुळे मुलांच्या ऊर्जेला योग्य मार्ग मिळत नाही व प्रयोगातून विज्ञानातील गंमत अनुभवण्यापासून ते वंचित राहतात. छोट्या हातांना योग्य मार्गदर्शनाखाली नवनिर्माण करू दिले तर भावी पिढी फक्त पुस्तकी न बनता आत्मनिर्भर बनेल, असा विश्‍वास अनेक पालकांनी रविवारी संडे सायन्स स्कूलच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेनंतर व्यक्त केला.

पुणे - स्वत:च्या हातांनी प्रयोग करायला मिळण्यातला आनंद काही औरच असतो. शाळा-घरांमध्ये अनेकदा मुलांना ‘हे करू नका-ते करू नका’ असेच सांगितले जाते. त्यामुळे मुलांच्या ऊर्जेला योग्य मार्ग मिळत नाही व प्रयोगातून विज्ञानातील गंमत अनुभवण्यापासून ते वंचित राहतात. छोट्या हातांना योग्य मार्गदर्शनाखाली नवनिर्माण करू दिले तर भावी पिढी फक्त पुस्तकी न बनता आत्मनिर्भर बनेल, असा विश्‍वास अनेक पालकांनी रविवारी संडे सायन्स स्कूलच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेनंतर व्यक्त केला. 

शाळेच्या पुस्तकात अक्षरात बंदिस्त विज्ञानाला मुलांनी वर्गात मोकळं सोडलं होत. छापील गोष्टींचा ते प्रत्यक्ष अनुभव घेत होते. मुलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्‍वास आणि आनंद होता, तर आपल्या मुलांना यापुढे न रागावण्याचं पालकांच्या डोळ्यांत शहाणपण!

शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्ये व कृतिशीलता वाढीस लागावी, वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांच्या वतीने इयत्ता तिसरी ते नववीसाठी ‘प्रात्यक्षिक विज्ञान वर्ग’ कोथरूड, सातारा रस्ता, सकाळ कार्यालय, सिंहगड रस्ता, बाणेर, पिंपळे सौदागर, हडपसर, चिंचवड, तळेगाव, चिखली व निगडीमध्ये रविवारपासून (ता. १६) सुरू झाले आहेत. येत्या रविवार (ता. २३) पर्यंत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश उपलब्ध असून, या सशुल्क उपक्रमात प्रवेश घेण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे.
संपर्क -  ९३७३०३५३६९/ ९८५००४७९३३ / ८७७९६७८७०९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday Science School Start Student Education Experiment