Vidhan Sabha 2019 : अजित पवार यांच्या नेतृत्त्वात बारामतीचा सर्वांगिण विकास : सुनेत्रा पवार

मिलिंद संगई
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

गेल्या अनेक वर्षांत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा सर्वांगीण विकास झाला.

- सुनेत्रा पवार.

बारामती शहर : गेल्या अनेक वर्षात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा सर्वांगीण विकास झाला आहे, पंतप्रधानांपासून अनेकांनी बारामतीच्या विकासाची स्तुती केलेली आहे. त्यामुळे या विकासाची गती कायम राखण्यासाठी अजित पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले. 

बारामती तालुक्यात आज पाहुणेवाडी, शिवनगर, येळेवस्तीसह अनेक गावात सुनेत्रा पवार यांनी कोपरा सभा घेतल्या. गावोगावी जाऊन गेल्या काही वर्षात अजित पवार यांनी केलेली विकासकामे लोकांपर्यत पोहोचवून आगामी पाच वर्षातही विकासाची प्रक्रिया अशीच कायम राहिल, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. 

टीकाटीपण्णी टाळून विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीने प्रचाराचा जोर कायम ठेवला असल्याचे चित्र यंदा दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वत: सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील अनेक गावातून कोपरा सभा घेतल्या. काही ठिकाणी पदयात्रांतून त्या सहभागी झाल्या तर काही ठिकाणी घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी संपर्क साधला.

गेल्या अनेक वर्षात बारामती व पवार कुटुंबियांचा परस्परांशी स्नेह आहे, हे एक समीकरणच बनून गेलेले आहे, त्या मुळे बारामतीच्या परिपूर्ण व सर्वांगिण विकासासाठी अजित पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार करीत आहेत.

वाढती महागाई, नोटाबंदी, बेरोजगारी या सारख्या मुद्यांवर युवक व महिला त्रस्त आहेत, यातून त्यांची सुटका करायची असेल व शेतक-यांना ख-या अर्थाने कर्जमाफी मिळवून त्यांना गतवैभव प्राप्त करुन द्यायचे असल्यास कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या मागे मतदारांनी ताकद उभी करावी, असे आवाहन त्यांनी या सभातून केले. 

जय पवार यांचाही सहभाग

अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे बारामती शहरातून पदयात्रांद्वारे मतदारांशी संपर्क साधत आहेत. घरोघरी जाऊन ते मतदारांना राष्ट्रवादीला मदत करण्याचे आवाहन करीत आहेत. यंदा जय पवार यांनी अनेक ठिकाणी भाषणे करुनही मतदारांना अजित पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunetra Pawar says About Developmnet of Baramati Maharashtra Vidhan Sabha 2019