Vidhan Sabha 2019 : राजकारणातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करू : कांबळे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

काँग्रेसच्या काळात केवळ जातीच्या आधारावर मतदारांना गृहीत धरण्यात येत होते. त्यांना केवळ आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली जात होती.

पुणे कॅन्टोन्मेंट : ''विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याने मात करण्याचा संदेश देणारा सण आहे. या मुहुर्तावर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील समस्या आणि राजकारणातील वाईट प्रवृत्तींवर मात करण्याची सुरवात होईल,'' असा विश्वास भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

काँग्रेसच्या काळात केवळ जातीच्या आधारावर मतदारांना गृहीत धरण्यात येत होते. त्यांना केवळ आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली जात होती. मात्र, विकासकामांच्या नावावर किरकोळ कामे करून त्यांची बोळवण केली जात होती. गेल्या पाच वर्षांत ही परिस्थिती बदलली.

दिलीप कांबळे यांच्या रूपाने या मतदारसंघाला भाजपचा समर्पित कार्यकर्ता आमदार म्हणून लाभला. त्यांनी या मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाची गंगा आणली. केंद्राने सुरू केलेल्या अनेक योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत थेट पोचवला. त्यामुळे अनेक लोकांचे जीवन सुखकर बनले आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.

या भागातील नागरिकांना आणखी सुविधा देण्यासाठी भाजपने मला उमेदवारी दिली आहे. निवडून आल्यानंतर या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासनही कांबळे यांनी दिले.

फोटो : विजयादशमीच्या संचलनात सहभागी झालेले सुनील कांबळे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंटमध्ये 25 हजारांहून जास्त मतांनी विजयी होणार : बापट

- Vidhan Sabha 2019 : पदाधिकारी राष्ट्रवादीची; प्रचार भाजप आमदाराचा, झाली बडतर्फ

- मंदीचा सर्वाधिक फटका भारताला; 90 टक्‍के जग कचाट्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Kambale comment about destroing the bad trends in politics