Vidhan Sabha 2019 : 'बाबा' नक्की निवडून येतील; सुनील कांबळेंच्या मुलींना विश्वास

Vidhan Sabha 2019 : 'बाबा' नक्की निवडून येतील; सुनील कांबळेंच्या मुलींना विश्वास

कॅन्टोन्मेंट : ''बाबांना भाजपने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि आता आमदारकीची संधी दिली आहे. या पदांच्या माध्यमातून त्यांनी पुणेकरांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाच्या पाठिंब्यावर ते आमदार म्हणून नक्की निवडून येतील,'' असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या कन्या सुप्रिया आणि पूर्वा यांनी व्यक्त केला. ''बाबा आणि भाजपचा अभिमान वाटतो,'' असेही या दोघींनी सांगितले.

प्रचारात व्यस्त असलेल्या सुनील कांबळे यांना हातभार लावण्यासाठी त्यांच्या दोन्ही कन्याही प्रचारात उतरल्या. काही भागांतील पदयात्रांमध्ये या दोन्ही कन्या त्यांच्या मैत्रिणींसह सहभागी झाल्या. कांबळे यांची मोठी मुलगी सुप्रिया हीव्हीआयटी महाविद्यालयात बारावीनंतर संगणक शाखेचे शिक्षण घेत आहे तर, दुसरी मुलगी पूर्वा ही फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. 

माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या रूपाने घरात राजकारणाचा वारसा असल्यामुळे त्यांना लहापणापासूनच निवडणूक, मतदान, पक्षाचे मेळावे, सभा यामध्ये जायला मिळाले. त्यासोबतच नगरसेवक म्हणून वडिल सुनील कांबळे यांचे कार्यही त्यांना जवळून पाहता आले.

सकाळपासूनच कांबळे यांच्या घरी विविध कामांसाठी नागरिक गर्दी करतात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पत्र देणे, संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून सूचना देणे किंवा प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ घेणे असे करून कांबळे या नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. या सगळ्या सामाजिक-राजकीय जीवनाच्या अनुभवाचा विद्यार्थी म्हणून फायदा होतो असेही या दोघींनी सांगितले.

''महाविद्यालयातही आम्हाला सुनील कांबळे यांच्या कन्या म्हणून प्राध्यापक, इतर सेवक आणि विद्यार्थीही ओळखतात. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला आदराची वागणूक मिळते. हा बाबांच्या कार्याचा आदर आहे,'' याची चांगली जाणीव असल्याचेही या दोघींनी सांगितले.

कांबळे यांच्या अर्धांगिनीही प्रचारात
सुनील कांबळे यांच्या अर्धांगिनी प्रीती बीए शिकलेल्या असून त्यांचा स्वतंत्र केटरिंगचा व्यवसाय आहे. त्या राजकारणात सक्रीय नसल्या तरीही पतीच्या राजकीय कारकीर्दीत त्या आपला वाटा उचलत असतात. सुनील कांबळे यांच्यासोबत प्रीती यांनीदेखील काही भागांतील पदयात्रांमध्ये भाग घेतला.

''सुनील कांबळे हे एक सहृदयी माणूस, उत्तम पती आणि समाजाच्या समस्या सोडविण्याची कणव असलेली व्यक्ती आहेत. त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळेच त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाचे नक्कीच विजयात रूपांतर होईल.''
-  प्रीती कांबळे, सुनील कांबळे यांच्या पत्नी

 ''काका आणि माजी मंत्री दिलीप कांबळे तसेच बाबांकडून भाजपविषयी माहिती होत गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांमुळे सामान्यांच्या जीवनात फरक पडला आहे, हे पाहायला मिळते आहे. मलाही या पक्षाच्या कामात खारीचा वाटा उचलता येतोय, याचा आनंद आहे.''
- सुप्रिया कांबळे, सुनील कांबळे यांची मुलगी

''मी छोटी असल्यामुळे बाबा माझे लाड करतात. त्यांच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या समस्याही ते तितक्याच आपुलकीने समजून घेतात आणि सोडविण्याचा प्रयत्न करतात. समस्या सोडविल्याननंतर त्या नागरिकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला की, माझ्या मनात बाबांविषयी आणि भाजपविषयी अभिमान वाढतो.''
- पूर्वा कांबळे, सुनील कांबळे यांची मुलगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com