Vidhan Sabha 2019 : सुनील कांबळे यांचा प्रचार शिगेला

sunil kambale campaign
sunil kambale campaign

कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे गेल्या दोन आठवड्यांपासून नियोजनबद्ध रितीने प्रत्येक मतदारापर्यंत पोचून प्रचार करत आहेत. केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेता तथा खासदार सनी देओल यांच्या मंगळवारी झालेल्या रोड शोमुळे येथील वातावरण तापले असून प्रचार शिगेला पोचल्याचे चित्र दिसू लागले आहे.

भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांची पदयात्रा बुधवारी चुडामण तालीम परिसर येथून सुरू झाली. ही पदयात्रा हरकानगर, गुरुनाथनगर, महात्मा फुले सोसायटी, कल्याण सोसायटी, शांतीनगर, टिंबर मळा, म्हसोबा मंदिर, राजीव गांधी एसआरए,मामुजी कॉलनी, कादरी पॅलेस परिसरातून गेली. पेस्टनजी दवाखाना परिसरात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

या पदयात्रेला नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिला. मुस्लिम बांधवांनी विशेष आपुलकीने स्वागत केले. ही पदयात्रा जसजशी पुढे सरकत होती तसतशी त्यातील लोकांची संख्या वाढत होती. भाजप, महायुती आणि कांबळे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.    

विविध जाती-धर्माच्या नागरिकांचे वास्तव्य असलेल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना सर्वच समाजातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यांतल्या प्रचारात दलित, मुस्लिम, ओबीसी, मेहतर अशा सर्वच समाजातील नागरिकांनी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये कांबळे यांच्या पदयात्रेचे उत्साहात स्वागत केले. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण केले. या समाजांतील तरुणांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही कांबळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

 काही वस्त्यांमध्ये फटाके वाजवून, गुलाल उधळून कांबळे यांचे स्वागत करण्यात आले. सर्वधर्मीय नागरिकांच्या श्रद्धेचा मान राखत कांबळे यांनी दर्गा, मंदिर, मशीद अशा धार्मिक स्थळांनाही भेट दिली. या पदयात्रेत नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील, माजी नगरसेवक संदीप लडकत, माजी नगरसेवक सुधीर जानजोत, तुषार पाटील, रिपाईचे नेते निलेश आल्हाट, शैलेश म्हेत्रे, रफिक शेख, शिवसेनेच्या पद्मा सोरटे,  मुनावर खान, सुनाब्बी शेख, नरेश बनसोडे, रमेश परदेशी, अनिल दामजी, आदी उपस्थित होते.

राजीव गांधी वसाहतीत समस्या सोडविण्याचे आश्वासन
कासेवाडी येथील राजीव गांधी वसाहतीत (एसआरए) अनेक समस्या आहेत. पाण्याचा अभाव , ड्रेनेज लाईनची गळती, सतत खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक पायाभूत सुविधाही येथे नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशी नागरिक त्रस्त आहेत. या परिसरात पदयात्रेसाठी गेले असता सुनील कांबळे यांनी येथील रहिवाशांना या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रहिवाशांनीही सुनील कांबळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे वचन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com