हिंजवडीचे गतवैभव मिळवून देणार : सुप्रिया सुळे

Supervised by Hinjawadi says Supriya Sule
Supervised by Hinjawadi says Supriya Sule

वारजे माळवाडी : "हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे
राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील कंपन्यानी बाहेर गेल्याने राज्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान व नोकऱ्या गेल्या आहेत. या परिसराचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. आमच्या या हिंजवडीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार आहे." असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

वाहतूक कोंडीला त्रस्त होऊन हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्या सोडून जात आहे. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रविवारी वारजे माळवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव येथील सभागृहात ही बैठक झाली. कंपन्यांचे अधिकारी कामगार यांचे फोरमशी याबाबत चर्चा केली. 

यावेळी मुळशीच्या सभापती कोमल सागर साखरे, मुख्य अभियंता सुधाकर वाघ, हिंजवडी फ्रिअपचे सुधीर देशमुख, हिरवा संस्थेचे रविंद्र सिन्हा, हर्ट संस्थेचे ज्ञानेन्द्र हुलसुरे, वारजे माळवाडीतील नगरसेवक सचिन दोडकेमाजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यावेळी उपस्थित होते. 

बैठकीत असताना त्यांनी पीएमआरडी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी- चिंचवड येथील वाहतूक विभाग यांच्याशी चर्चा केली. या सरकरी यंत्रणेबरोबर यांच्या बरोबर खासदार सुळे पुढील सोमवारी 10 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. उद्या 3 सप्टेंबर सोमवारी म्हणजे पीएमआरडीए, एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची एक संयुक्त पाहणी होईल. बुधवारी एमआयडीसीचे अधिकारी हिंजवडी येथे राबविल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देणार आहेत. 

रस्ता, पुलांचे रुंदीकरण करणे, प्रस्तावित रस्ते पाठपुरावा करून घेणे, वाहतूक कोंडी करणारे अतिक्रमण काढणे, दुभाजक कमी- जास्त करणे वीजेचे खांब काढणे अशा उपाययोजना करून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना माहिती दिली. 

आयटी पार्क मधील कंपन्या जिल्ह्याबाहेर गेल्यामुळे पुण्याबाहेर गेल्यामुळे सुमारे पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याबरोबर नोकऱ्या देखील गेल्या आहेत. 

काही विषयांच्या संदर्भात एमआयडिसी, पुणे  पिपरी चिंचवड, महानगरपालिका यांच्या संदर्भातली काही विषय आहेत त्या सोडविणे. यासंदर्भात मागील तीन-चार वर्षात राज्य सरकारकडून दुर्लक्ष झाले आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे सीईओ यांनी वारंवार बैठका घेतल्या. तरी देखील प्रश्न तसेच आहेत.फेज थ्री मधील बिझनेस सेंटर वाढलेले आहेत. परंतु त्या प्रमाणात येथील वाहतुकीच्या पायाभूत सुविधा वाढलेल्या नाहीत.

हिंजवडीसाठी स्वतंत्र यंत्रणा हवी

येथील मागील सहा महिन्यात अनेक कंपन्या पुण्याबाहेर गेल्यामुळे पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तर अनेक नोकऱ्या गेल्या ही दुर्दवाची घतना असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, येथील रहिवासी अधिकारी कामगार वर्ग, त्याचबरोबर स्थानिक ग्रामपंचायत यांच्या मदतीने आम्ही यासाठी पाठपुरावा करीत आहोत.  स्थानिक सरपंचांचे अधिकार हे मर्यादित आहे. येथील प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी सरकारी विशेष यंत्रणा उभारली गेली पाहिजे. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com