मराठीच्या पेपरला बोगस विद्यार्थी ; सुपरवायझरच्या सतर्कतेमुळे तोतयागिरी उघड

प्रफुल्ल भंडारी
Saturday, 21 November 2020

एसएससी बोर्डाची ऑक्टोबर मध्ये होणारी इयत्ता दहावीची २० नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. दौंड - पाटस रस्त्यावरील मेरी मेमोरियल हायस्कूल मध्ये २० नोव्हेंबर रोजी परीक्षा हॅाल क्रमांक एक मध्ये मयुर प्रकाश कापरे (रा. पिंपळगांव , ता. दौड) या परीक्षार्थीच्या जागी मयुरी उर्फ पल्लवी प्रकाश कापरे ( वय १९ , रा. पिंपळगांव , ता. दौंड) ही परीक्षा देताना आढळुन आली.

दौंड (पुणे): गिरीम (ता. दौंड) येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या मराठी भाषेच्या पेपरला डमी परीक्षार्थी बसविल्याप्रकरणी डमी आणि मूळ परीक्षार्थी, अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यवेक्षिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे.
 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एसएससी बोर्डाची ऑक्टोबर मध्ये होणारी इयत्ता दहावीची २० नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. दौंड - पाटस रस्त्यावरील मेरी मेमोरियल हायस्कूल मध्ये २० नोव्हेंबर रोजी परीक्षा हॅाल क्रमांक एक मध्ये मयुर प्रकाश कापरे (रा. पिंपळगांव , ता. दौड) या परीक्षार्थीच्या जागी मयुरी उर्फ पल्लवी प्रकाश कापरे ( वय १९ , रा. पिंपळगांव , ता. दौंड) ही परीक्षा देताना आढळुन आली. तसेच परीक्षा हॅाल क्रमांक दोन मध्ये परीक्षार्थी गणेश दत्तोबा भोसले (रा. केडगाव, ता. दौंड) याच्या जागी बाळू शिवाजी भोसले (वय २२ , रा. सिध्दटेक, ता. कर्जत , जि. नगर) हा परीक्षा देताना आढळुन आला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यवेक्षिका नसरीन कुरेशी व प्रियवंदा  कांबळे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मेरी मेमोरियल हायस्कूलच्या प्राचार्या मनीषा सालोमन यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार चौघांवर फसवणूक व तोतयागिरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supervisor exposes the bogus students in Marathi paper at daund pune